घरताज्या घडामोडीInternational Flight: देशात १५ डिसेंबरपासून आंतरराष्ट्रीय विमान सेवा सुरू होणार नाहीत, फक्त...

International Flight: देशात १५ डिसेंबरपासून आंतरराष्ट्रीय विमान सेवा सुरू होणार नाहीत, फक्त विशेष उड्डाण होणार

Subscribe

कोरोनामुळे गेल्या दीड वर्षांपासून बंद असलेली आंतरराष्ट्रीय विमान सेवा आता १५ डिसेंबरपासूनही सुरू होणार नसल्याचे समोर आले आहे. काही दिवसांपूर्वी नागरी विमान वाहतूक मंत्रालयाकडून डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात म्हणजेच १५ डिसेंबरपासून आंततराष्ट्रीय विमान सेवा पुन्हा सुरू होणार असल्याचे जाहीर केले होते. परंतु अजूनपर्यंत या मुद्द्यावर कोणताही ठाम निर्णय झाला नाही. फक्त विशेष विमान उड्डाण सुरू होणार असल्याचे सांगितले जात आहे. याबाबत नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) जारी केलेल्या नोटमध्ये म्हटले आहे की, ‘बदललेल्या जागतिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर परिस्थितीचे सध्या बारकाईने निरीक्षण केले जात आहे आणि सर्व संबंधितांशी चर्चा केल्यानंतर, आंतरराष्ट्रीय प्रवासी सेवा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला जाईल आणि योग्य वेळी कळवला जाईल.’

गेल्या वर्षी मार्च महिन्यापासून आंतरराष्ट्रीय विमान सेवा बंद करण्यात आली आहे. शुक्रवारी २६ नोव्हेंबरला नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने कर्मशिअल आंतरराष्ट्रीय विमान सेवा पुन्हा सुरू करण्याच्या मुद्द्यावर गृहमंत्री मंत्रालय, परराष्ट्र मंत्रालय, आरोग-कुटुंब कल्याण मंत्रालयाने सहमती दर्शवली होती. ज्यानंतर १५ डिसेंबरपासून आंतरराष्ट्रीय विमान सेवा सुरू होऊ शकतात, असा अंदाज वर्तवला गेला होता. परंतु सध्याची परिस्थिती पाहता १५ डिसेंबरपासून आंतरराष्ट्रीय विमान सेवा सुरू होण्याची शक्यता फार कमी आहे.

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही संबंधित मंत्रालय आणि अधिकाऱ्यांना याबाबतचा आढावा घेण्यास सांगितले होते. एका बैठकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना व्हायरसच्या अनुषंगाने सक्रीय राहणे गरजेचे असल्याचे म्हणाले होते. यासोबत त्यांनी सर्व आंतरराष्ट्रीय विमान सेवा आणि सूचनांनुसार प्रवाशांची तपासणी करण्यावर भर दिला होता.


हेही वाचा – एअर इंडियानंतर मोदी सरकार विकणार ‘ही’ सरकारी कंपनी, २१० कोटींना डील पक्की

- Advertisement -

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -