घरदेश-विदेशआशियातील अर्थव्यवस्थेबाबत Moody's चा मोठा दावा; भारताला दिला धोक्याचा इशारा

आशियातील अर्थव्यवस्थेबाबत Moody’s चा मोठा दावा; भारताला दिला धोक्याचा इशारा

Subscribe

भारतीय रुपया हा जवळजवळ वर्षभर अस्थिर आहे आणि प्रमुख जागतिक चलनांच्या तुलनेत अमेरिकन डॉलर मजबूत झाल्यामुळे भारत आतापर्यंतच्या नीचांकावर पोहोचला आहे.

आशिया खंडात नव्याने उदयाला येणा-या अर्थव्यवस्थांबाबत मूडीज अॅनालिटिक्सने मोठा दावा केला आहे. मूडीजने दिलेल्या अहवालात म्हटले आहे की, आशियातील उदयोन्मुख अर्थव्यवस्थांमध्ये चलन कमकुवत होण्याचा धोका निर्माण झाला आहे, हा चिंतेचा विषय आहे. याचा भारताला मोठा फटका बसणार असल्याचे मुडीजच्या अहवालात सांगण्यात आले आहे.

भारतीय रुपया हा जवळजवळ वर्षभर अस्थिर आहे आणि प्रमुख जागतिक चलनांच्या तुलनेत अमेरिकन डॉलर मजबूत झाल्यामुळे भारत आतापर्यंतच्या नीचांकावर पोहोचला आहे. ऑक्टोबर 2022 मध्ये, रुपयाने इतिहासात प्रथमच 83 चा टप्पा ओलांडला. भारतात सध्या आता एका डॉलरची किंमत 82 रुपये आहे. मूडीजच्या मते, रुपया असाच घसरत राहिला तर भारताची अर्थव्यवस्था सर्वोत्तम कामगिरी करणार्‍या अर्थव्यवस्थांपैकी एक व्हायचं सोडून भारत पुन्हा अपेक्षेपेक्षा कमी गतीने वाटचाल करु शकतो.

- Advertisement -

आयात केलेल्या वस्तूंच्या उच्च किंमतीमुळे परकीय चलन कमी होऊ शकते. यूएस फेडरल रिझर्व्हने आर्थिक धोरण कडक केल्याने चलनाचे अवमूल्यन सुरू झाले आहे. गुंतवणूकदार हे चांगल्या आणि स्थिर परताव्यासाठी यूएससारख्या स्थिर बाजाराकडे वळतात. सामान्यत: रुपयाचे प्रचंड अवमूल्यन रोखण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया वेळोवेळी बाजारात हस्तक्षेप करत असते. फेब्रुवारीच्या मध्यात रिझर्व्ह बॅंकेने गेल्या 10 महिन्यांत सलग सहाव्यांदा रेपो दर वाढवण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे कर्जाचे व्याजदरही वाढले आहेत.

फेब्रुवारी महिन्यात झालेल्या बैठकीत, RBI च्या चलनविषयक धोरण समितीने (MPC) रेपो दर 0.25 बेसिस पॉइंट्सने वाढवून 6.5 टक्के करण्याचा निर्णय घेतला. महागाईला आळा घालण्यासाठी गेल्या वर्षी मे महिन्यात दरवाढ सुरू झाली. मूडीजने दिलेल्या माहितीनुसार, 15 मे ते 15 जुलै दरम्यान डॉलरच्या तुलनेत रुपया 9.3 टक्क्यांनी घसरला आहे. चलन घसरल्याने काही कंपन्यांना परकीय चलन कर्जाची परतफेड करणे कठीण होऊ शकते. त्यामुळे कच्च्या मालाची किंमतही वाढू शकते.

- Advertisement -

( हेही वाचा: देशात पुन्हा कोरोनाचे थैमान, XBB.1.16 प्रकाराची 349 प्रकरणे समोर )

आता ताज्या वाढीनंतर रेपो दर 6.5 टक्के झाला आहे. मुडीजचा दावा आहे की जर रुपया असाच घसरत राहिला तर आरबीआय पुढील महिन्यात म्हणजे एप्रिलमध्येही रेपो दर वाढवू शकते.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -