घरदेश-विदेशअॅपल'च्या विक्रीत घट

अॅपल’च्या विक्रीत घट

Subscribe

अगदी काहीच महिन्यांपूर्वी अॅपलने आयफोन एक्स बाजारात आणला. अॅपलने या फोनवर हवी तशी सूट न दिल्यामुळे अनेकांनी या फोनकडे पाठ फिरवली

अॅपलचा आयफोन हा स्टेटस सिंबॉल म्हणून अनेक जण विकत घेतात. हल्ली १० पैकी ९ जणांकडे हमखास आयफोन असतो. पण २०१८ हे वर्ष आयफोनसाठी काही खास नाही, असे समोर आले आहे. कारण आयफोनच्या विक्रीमध्ये कमालीची घट झाल्याचे समोर आले आहे. २०१८ च्या पहिल्या सत्रात या फोनच्या विक्रीत घट झाली असून ही घट तब्बल ५५ % टक्क्यांनी कमी झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आयफोनसाठी हे वर्ष जरा कठीणच असल्याचे एका अहवालातून समोर आले आहे.

आयफोनच्या पॉलिसीमुळे घट

अगदी काहीच महिन्यांपूर्वी अॅपलने आयफोन एक्स बाजारात आणला. अॅपलने या फोनवर हवी तशी सूट न दिल्यामुळे अनेकांनी या फोनकडे पाठ फिरवली. त्यामुळे एप्रिल- जून या महिन्यादरम्यान फोनच्या विक्रीमध्ये ३० % घट दिसली. तर आधीचा विचार करायचे झाले तर वर्षाची सुरुवातच अॅपलसाठी वाईट होती.

- Advertisement -
iphone x
आयफोनचा नवा ‘आयफोन एक्स’

 

अॅपलपेक्षा अँड्राईड फोन बरा

आयफोनच्या किंमती पाहता अनेक जण अँड्राईड फोनकडे वळतात. विशेषत: हल्लीच्या काही महिन्यांमध्ये अन्य कंपन्यांचे उत्कृष्ट फोन मॉडेल्स बाजारात आल्यामुळे साहजिकच आयफोनकडे अनेकांनी पाठ फिरवली. विशेषत: वन प्लस सारखा फोन बाजारात आल्यानंतर उत्तम कॅमेरा क्वालिटीमुळे आयफोनला पसंती मिळत नसावी, असा अंदाज फोन विक्रेत्यांनी केला आहे. शिवाय भारतासारख्या देशात मोबाईल फोनची सर्वाधिक खरेदी केली जाते. आयफोन घेण्याची अनेकांची इच्छा असते. पण या फोनसाठी मोजावी लागणारी किंमत जास्त असल्याने देखील या फोनचा सेल कमी होत असावा, असे देखील विक्रेत्यांचे म्हणणे आहे.

- Advertisement -

गेल्यावर्षी ३२ लाख फोनची विक्री

२०१४ सालानंतर आयफोनच्या विक्रीमध्ये कमालीची वाढ झाली होती. २०१५ मध्ये १८ लाख फोनची विक्री झाली होती. २०१६ मध्ये २८ लाख तर २०१७ मध्ये आयफोन विक्रीचा आकडा ३२ लाखांपर्यंत गेला होता. पण २०१८ च्या पूर्वार्धात फक्त ८ लाख ५० हजार फोनची विक्री झाली आहे. जी गेल्यावर्षीच्या तुलनेत ३० % आहे, अशी माहिती द प्रिमिअर ग्लोबल मार्केटने इकोनॉमिक टाईम्सला दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -