Sunday, April 18, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश ISISचा म्होरक्या बगदादीचा मुलगा ठार

ISISचा म्होरक्या बगदादीचा मुलगा ठार

ISISया दहशतवादी संघटनेचा म्होरक्या अबुबक्र अल बगदादी याचा मुलगा औष्णिक प्रकल्पावर केलेल्या हल्लामध्ये ठार झाला आहे. स्थानिक धर्मपंथीय आणि रशियाच्या ताब्यात असलेला प्रकल्प आपल्या ताब्यात घेण्यासाठी ISISने हा हल्ला केला होता. त्यावेळी झालेल्या हल्ल्यात अबुबक्र अल बगदादीचा मुलगा ठार झाला आहे.

Related Story

- Advertisement -

ISISया दहशतवादी संघटनेचा म्होरक्या अबुबक्र अल बगदादीला मोठा धक्का बसला आहे. या क्रुरकर्मा दहशतवाद्याचा मुलगा सीरियामध्ये ठार झाला आहे. जिहादी गटाने औष्णिक वीज प्रकल्प केंद्रावर केलेल्या कारवाई दरम्यान बगदादीचा मुलगा ठार झाला आहे. सध्या सीरियातील ३ टक्के भागावर ISISने कब्जा केला आहे. स्थानिक नसरिय्या पंथ आणि रशियन यांचा होम्स येथील औष्णिक ऊर्जा प्रकल्पावरती ताबा होता. २०१४ साली ISISला या औष्णिक प्रकल्पावरून हुसकावून लावण्यात आले होते. त्यामुळे औष्णिक प्रकल्पावर काहीही करून ताबा मिळवायचाच या इर्षेने ISISने होम्स येथील औष्णिक प्रकल्पावर हल्ला केला. यावेळी झालेल्या चकमकीत अबुबक्र अल बगदादीचा मुलगा ठार झाला आहे. मुलाचा मृत्यू हा अबुबक्र अल बगदादीसाठी मोठा धक्का आहे. मंगळवारी अबुबक्र अल बगदादीचा मुलगा ठार झाल्याची बातमी त्याच्या फोटोसहित ISISकडून जाहीर करण्यात आली.

इराक सीरियामध्ये ISISच्या अतिरेकी कारवाया

इराक आणि सीरियामध्ये ISISच्या अतिरेकी कारवाया दिवसेंदिवस वाढत आहेत. २०१४ साली ISISने सीरियातील औष्णिक प्रकल्पावरती ताबा मिळवला. पण त्यानंतर रशियन सैन्याने केलेल्या कारवाईमध्ये या औष्णिक प्रकल्पावरून ISISला पळवून लावण्यात रशियन सैन्याला यश आले. सीरिया आणि रशियामध्ये ISISच्या कारवायांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. शिवाय ISIS अत्याचारांमध्ये कळस गाठत आहे. ISISचे तळ उद्धवस्त करण्यासाठी अमेरिकेकडून देखील वेळोवेळी ड्रोन हल्ले करण्यात येतात. यामध्ये ISISच्या अनेक क्रुर दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. मात्र ISISच्या दहशतवादी कारवायांमध्ये आणि अत्याचारांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. शिवाय, युरोपातील दहशतवादी संघटना आता आशिया खंडामध्ये देखील हातपाय पसरताना दिसत आहे. दहशतवादाचा वाढता धोका लक्षात घेता ISISला वेळीच आवर घालणे गरजेचे आहे.

- Advertisement -