घरदेश-विदेशजगातील नवं 'कोविड हॉटस्पॉट' बनलं इस्रायल; लसीकरणानंतरही कोरोनाचं थैमान

जगातील नवं ‘कोविड हॉटस्पॉट’ बनलं इस्रायल; लसीकरणानंतरही कोरोनाचं थैमान

Subscribe

गेल्या दीड वर्षांपासून देशसह जगभरात कोरोनाचा कहर सुरू असून अद्याप तो पूर्णतः नाहिसा झालेला नाही. अशातच कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढू नये तो नियंत्रणात रहावा, यासाठी जगभरात कोरोना लसीकरण मोहीम सुरू आहे. दरम्यान, इस्रायलमध्ये लसीकरणाचा दर सर्वात वेगवान असूनही, या देशात लसीकरणानंतर देखील कोरोनाचा प्रादुर्भाव दिसत आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या कोरोनाच्या रुग्ण संख्येमुळे इस्रायल हा देश जगातील नवं ‘कोविड हॉटस्पॉट’ बनलं आहे. यामुळे, ब्रिटन, अमेरिका आणि त्या देशांना चेतावणी देण्यात येत आहे की, लसीकरणाच्या मोठ्या लोकसंख्येनंतरही या देशांना कोरोनाच्या आणखी एका लाटेचा सामना करावा लागू शकतो. इस्त्रायलमध्ये १० लाख लोकसंख्ये पैकी १ हजार ८९२ कोरोना रूग्णांची नोंद करण्यात येत आहे. ऑगस्टच्या मध्यापासून, इस्रायलमध्ये संसर्गाची मोठी नोंद केली जात आहे. सध्या देश अशाच कोरोनाच्या लाटेचा सामना करत असून हा जगातील सर्वाधिक लसीकरण करण्यात आलेला देश आहे.

दरम्यान, इस्रायलमध्ये कोरोनाच्या चौथ्या लाटेमुळे विक्रमी रूग्णांची नोंद करण्यात येत आहे. असे असले तरी लसीकरण झालेले लोकं गंभीर आजारापासून वाचत आहे. हेच कारण आहे की दुसऱ्या लाटेच्या तुलनेत कोरोनामुळे केवळ अर्ध्या लोकांचा मृत्यू झाला आहे. मात्र, गेल्या महिन्यात मृतांची संख्या वाढली असून इस्रायलमध्ये जुलैपासून ६० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना बूस्टर डोस दिले जात आहेत.

- Advertisement -

इस्त्रायलमध्ये मोठ्या प्रमाणात होणाऱ्या लसीकरणामुळे रूग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्या कमी झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. इस्त्रायलमध्ये, १२ वयापेक्षा जास्त वयाच्या लोकांना दोन डोस दिले आहेत, अशा सर्व लोकांना बूस्टर डोस दिला जात आहे. तसेच, कोरोनाला सामोरे जाण्यासाठी, इस्रायलमधील नागरिकांवर कोविड -१९ चा बूस्टर डोस घेण्याचा दबावही टाकला जात आहे. ज्या लोकांना लसीचा तिसरा डोस मिळाला नाही त्यांना प्रवास करणे, बारमध्ये जाणे, बाहेर खाणे आणि इतर कार्यक्रमांना उपस्थित राहण्यास बंदी आहे.


 

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -