घरदेश-विदेशVideo: इस्त्रोच्या सॅटेलाईट EOS-03 चं लाँचिंग फेल; क्रायोजेनिक यंत्रणेत बिघाड झाल्याने मिशन...

Video: इस्त्रोच्या सॅटेलाईट EOS-03 चं लाँचिंग फेल; क्रायोजेनिक यंत्रणेत बिघाड झाल्याने मिशन अपूर्ण

Subscribe

इस्रोने आज सकाळी ५ वाजून ४३ मिनिटांनी आंध्र प्रदेशमधील श्रीहरीकोटा येथून GSLV F-10 लाँच करण्यात आलं. क्रायोजेनिक यंत्रणेत बिघाड झाल्याने सॅटेलाईट अंतराळ कक्षेत स्थिरावण्यात अयशस्वी झाला. त्यामुळे हे मिशन संपूर्ण अयशस्वी झालं नाही अशी माहिती इस्त्रोचे अध्यक्ष के. सीवन यांनी दिली. हे सॅटेलाईट पृथ्वीवर नजर ठेवण्यास मदत करणार होतं.

इस्रोने श्रीहरीकोटातून सकाळी ५ वाजून ४३ मिनिटांनी EOS-03 चे यशस्वी प्रक्षेपण झालं. मात्र, पहिल्या दोन टप्प्यात यशस्वी उड्डाण झाल्यानंतर तिसऱ्या टप्प्यामध्ये मात्र क्रायोजेनिक यंत्रणनेमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे सॅटेलाईट अंतराळ कक्षेत स्थिरावण्यात अयशस्वी झाला. शेवटच्या टप्प्यात ईओएस -3 अलग होण्यापूर्वी क्रायोजेनिक इंजिनमध्ये काही बिघाड झाला होता. त्यानंतर इस्रोला संबंधित माहिती मिळायची बंद झाली. तपासानंतर मिशन कंट्रोल सेंटरमध्ये बसलेल्या इस्रोचे प्रमुख डॉ. के. शिवन यांना याबाबत माहिती देण्यात आली. यानंतर, त्यांनी जाहीर केले की ईओएस -3 मिशन अंशतः अपयशी ठरले आहे.

- Advertisement -

या सॅटेलाईटचं ‘आय इन दी स्काय’ असं वर्णन केलं जात होतं. शत्रुराष्ट्रांवर नजर ठेवण्यासाठी या सॅटेलाईटची मोठी मदत होणार होती. गेल्या वर्षीपासून याच्या प्रक्षेपणासाठी अडचणी येत असल्याने आजवर तीन वेळी याचं प्रक्षेपण थांबवण्यात आलं.

- Advertisement -

नैसर्गिक आपत्तीवर लक्ष ठेवण्यास होणार होती मदत

या सॅटेलाईटची नैसर्गिक आपत्तीवर लक्ष ठेवण्यास मदत होणार होती. त्याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे ते मोठ्या अंतराने ओळखलेल्या क्षेत्राच्या रिअल-टाइम प्रतिमा सातत्याने काही अंतराने पाठवण्यास मदत होणार होती. या व्यतिरिक्त, हे नैसर्गिक आपत्तींवर तसेच कोणत्याही अल्पकालीन घटनांवर त्वरित देखरेख ठेवण्यास मदत होणार होती. हा उपग्रह शेती, वनीकरण, पाणवठे तसेच आपत्तीचा इशारा, चक्रीवादळाबाबत माहिती, ढगफुटी किंवा वादळी पावसासह विविध भागांमधील क्षेत्रावर लक्ष ठेवण्यासाठी आणि त्याबाबतची महत्वाची माहिती पुरवण्याचे काम हा उपग्रह करणार होता.

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -