कोणी कठीण परिश्रम घेत असले तर चांगलं वाटतं; अमित शाहांनी केलं राहुल गांधींचं कौतुक

amit shah bihar visit for 2 days shah slams laluprasad yadav and nitish kumar

नवी दिल्ली – गेल्या दोन महिन्यांपासून भारताच्या विविध भागातून जात असलेल्या भारत जोडो यात्रेवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काहीच प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र, आज पहिल्यांदा अमित शहा यांनी यावर वक्तव्य केलं आहे. कोणी कठीण परिश्रम घेत असेल तर चांगलं वाटतं, असं अमित शहा म्हणाले.

राजकारणी तसेच नेत्यांनी नेहमी परिश्रमी राहायला हवे. जेव्हा कुणी असे कठीण परिश्रम घेत असताना दिसतं तेव्हा चांगलं वाटतं, असं अमित शहा म्हणाले. काँग्रेस आताही मुख्य विरोधी पक्ष आहे. सध्या हा पक्ष राष्ट्रीय स्थरावर संकटातून जात आहे. याचा परिणाम गुजरातमध्ये देखील दिसत आहे. भाजपकडे मोदींसारखा लोकप्रिय नेता असल्यावर त्यांच्या नावावर निवडूक लढवण्यात काय गैर आहे? असेही देखील अमित शहा म्हणाले.

राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा ७ सप्टेंबरपासून सुरू झाली आहे. ३ हजार ५७० किमीचा प्रवास करत ही यात्रा १२ राज्यातून प्रवास करत जम्मू काश्मीरमध्ये या यात्रेची सांगता होणार आहे.