घरक्रीडाकिरॉन पोलार्ड बनणार मुंबई इंडियन्सचा कर्णधार, तर राशिदलाही दिलं मोठं गिफ्ट

किरॉन पोलार्ड बनणार मुंबई इंडियन्सचा कर्णधार, तर राशिदलाही दिलं मोठं गिफ्ट

Subscribe

आयपीएल २०२३ च्या १६ व्या हंगामाची चाहूल सुरू झाली आहे. येत्या २३ डिसेंबरला लिलाव प्रक्रिया पार पडणार असल्याचं सांगितलं जात आहे. याबाबत बीसीसीआयने माहिती दिली आहे. मुंबई इंडियन्स संघाचा सलामीवीर खेळाडू किरॉन पोलार्डने संघातून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला होता. परंतु त्याच्यावर आता मोठी जबाबदारी सोपावण्यात आली आहे. मुंबई इंडियन्सचा फलंदाजी प्रशिक्षक म्हणून पोलार्ड आयपीएलमध्ये राहणार आहे.

पोलार्डला मोठी जबाबदारी दिल्यानंतर फिरकीपटू राशिद खानलाही मोठं गिफ्ट देण्यात आलं आहे. आकाश अंबानीने सांगितलं की, किरॉन पोलार्ड आणि राशिद खान यांच्याकडे अनुक्रमे मुंबई इंडियन्स एमिरेट्स आणि मुंबई इंडियन्स केप टाऊन संघाचे कर्णधारपद सोपवण्यात मला आनंद होत आहे.

- Advertisement -

दुबईत आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय टे्वेंटी-२० लीगचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. १३ जानेवारी ते १२ फेब्रुवारी २०२३ च्या कालावधीत ही लीग खेळवण्यात येणार आहे. अबुधाबी जयेद क्रिकेट स्टेडियमवर १४ जानेवारीला पहिला सामना खेळवण्यात येणार आहे.

- Advertisement -

MI Emiratesचे वेळापत्रक काय?

१४ आणि १७ जानेवारी – वि. शारजा वॉरियर्स
२१ जानेवारी – वि. नाईट रायडर्स
२२ जानेवारी – वि. दुबई कॅपिटल्स
२४ जानेवारी – वि. डेजर्ट व्हायपर्स
२७ जानेवारी – वि. गल्फ जायंट्स
२९ जानेवारी – वि. डेजर्ट व्हायपर्स
१ फेब्रुवारी – वि. गल्फ जायंट्स
३ फेब्रुवारी – वि. नाईट रायडर्स
५ फेब्रुवारी – वि. दुबई कॅपिटल्स

यंदाच्या आयपीएलच्या लिलावात ९९१ नोंदणीकृत खेळाडूंवर बोली लागणार आहे. यंदाच्या खेळाडूंच्या यादीत ऑस्ट्रेलियन खेळाडूंचे वर्चस्व आहे. तिथल्या ५७ खेळाडूंनी लिलावासाठी साइन अप केले आहे. त्याखालोखाल दक्षिण आफ्रिका (५२), वेस्ट इंडिज (३३) आणि इंग्लंड ३१) या देशांचा क्रमांक लागतो. दरम्यान, या लिलावासाठी भारतातील १९ कॅप्ड खेळाडूंनी नोंदणी केली आहे.


हेही वाचा :ठरलं! आयपीएलचा लिलाव ‘या’ तारखेला होणार; 991 खेळाडूंवर लागणार बोली


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -