ITR Filing : करदात्यांना मोठा दिलासा, आयटी रिटर्न्स भरण्याच्या मुदतीत वाढ, जाणून घ्या डेडलाईन?

Income tax return

केंद्र सरकारने आयटी रिटर्न्स भरण्याच्या मुदतीत पुन्हा एकदा वाढ केली आहे. याआधी ३१ डिसेंबरपर्यंत प्राप्तीकर भरण्याची अंतिम मुदत देण्यात आली होती. त्यामुळे अनेक जणांनी अखेरच्या दिवशी प्राप्तीकर भरली. परंतु आता आयटी रिटर्न्स दाखल करण्याची अंतिम मुदत १५ मार्च २०२२ रोजी पर्यंत वाढवण्यात आली आहे. ज्यांनी आतापर्यंत आयटी रिटर्न्स फाईल केली नसेल तर त्यांच्यासाठी शेवटचा पर्याय केंद्र सरकारकडून देण्यात आला आहे.

आयटी रिटर्न फाईल करण्याची संधी

एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, पुढील तीन महिन्यांमध्ये सुद्धा करदाते आयकर परतावा भरू शकणार आहे. आयटी रीटर्न्स दाखल करण्याची अंतिम तारीख उलटून गेल्यानंतरही आयटी रिटर्न फाईल करण्याची संधी दिली जाते. त्यामुळे त्याला बिलेटेड आयटीआर असं म्हणतात. खास नियमांसह दंडाची आकारणीही केली जाते. परंतु करदाते कुठलाही दंड न भरता १५ मार्चपर्यंत आयकर परतावा भरू शकणार आहेत.

एखाद्या व्यक्तीचं उत्पन्न २.५ लाख रुपयांपेक्षा अधिक असेल तर त्यासाठी आयटी रिटर्न दाखल करावा लागतो. मागील वर्षीच्या उत्पन्नाच्या गणनेसाठी ३ ते ४ महिने आर्थिक वर्ष संपल्यानंतर दिले जातात. तसेच कर देण्यास पात्र उत्पन्न मोजणी आणि त्यानुसार कर देण्यासाठी असतो. जर तुम्ही व्हिसासाठी अर्ज केला असेल तर अनेक दुतावासांकडून मागील वर्षांची आयटीआर पावती मागितली जाते.

३१ डिसेंबरला अनेक लोकांकडून आयटी रिटर्न्स दाखल

आयकर कायद्याच्या कलम १३९(१) अंतर्गत, निर्धारित वेळेत ITR वेळेवर दाखल न केल्यास त्या व्यक्तीला कलम 234A अंतर्गत दंड भरावा लागतो. दरम्यान, ३१ डिसेंबरच्या शेवटच्या दिवशी अनेक लोकांनी आयटी रिटर्न्स दाखल केलं होतं. यासंबंधीत आयकर विभागाने देखील अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून माहिती दिली होती. यामध्ये ३० डिसेंबर २०२१ रोजी रात्री ८ वाजेपर्यंत २४.३९ लाख आयटी रिटर्न्स दाखल करण्यात आले होते.


हेही वाचा : शंभर टक्के गोवा आणि उत्तर प्रदेशमध्ये परिवर्तन होणार, संजय राऊतांचा विश्वास