घरदेश-विदेशजामिया प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी

जामिया प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी

Subscribe

दिल्लीत नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात जामिया विद्यापीठात झालेल्या आंदोलनाने रविवारी एक हिंसक वळण घेतले होते तर त्याबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे.

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात ईशान्य राज्यात सुरू झालेल्या आंदोलनाची आग ही देशभरात पसरली. दिल्लीतही जामिया मिलीया विद्यापीठात या कायद्याविरोधात निषेध दरशवणारी आंदोलने झाली. तर रविवारच्या रोजी या आंदोलनाने एक हिंसाचारक वळण घेतले. या संपूर्ण घटनेत विद्यापीठाचे अनेक विद्यार्थी हे जखमी झाले आहेत तर काहींना अटक देखील करण्यात आली आहे. आंदोलना दरम्यान सुमारे ५० विद्यार्थ्यांना ताब्यात घेण्यात आले होते मात्र नंतर त्यांना सुटका देण्यात आली होती. तर आज पुन्हा १० जणांना ताब्यात घेण्यात आले आहे आणि पोलिसांच्या सांगण्याप्रमाणे अटक केलेल्यांमधून कोणही जामिया विद्यापीठाचे विद्यार्थी नाही आहेत. सीसीटिव्ही फुटेज पाहून पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे. जामिया हिंसाचार प्रकरणी गुन्हेगारी पार्श्वभूमीवर या १० जणांना अटक केलेली आहे. तर ही घटना वादग्रस्त असून या बद्दलचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी होणार आहे.

या आंदोलना दरम्यान जो काही गोंधळ आणि दंगे सुरु होते ते थांबलाशिवाय कोर्टात काही सुनावणी होणार नाही अशी माहिती सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी दिली. गाड्या आणि वस्तूंची तोडफोड. मारहाण, दगडफेक या सगळ्या गोष्टी थांबल्याशिवाय कोर्ट काही ही करणार नाही असं देखील सांगितले होते. सगळ शांत झाल्यानंतर दोन्ही बाजू मांडल्या जातील आणि कोर्ट या संदर्भात आवश्यक ती सनावणी देईल.


हेही वाचा: आसाम: आजपासून कर्फ्यू मागे, इंटरनेट सेवा सुरू

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -