आसाम: आजपासून कर्फ्यू मागे, इंटरनेट सेवा सुरू

११ डिसेंबरपासून लागू करण्यात आलेला आसाम मधील कर्फ्यू आजपासून हटवण्यात आला आहे.

today curfew lifted and internet connectivity restored in assam
आसाम मधली आजपासून कर्फ्यू मागे तर इंटरनेट सेवा सुरू

काही दिवसांपूर्वी लोकसभेत आणि राज्यसभेत नागरिकत्व दुरुस्ती कायदा मंजूर झाल्यानंतर आसाम मध्ये आंदोलनाचे पडसाद उमटू लागले. या कायद्याच्या विरोधात आसाम मधील आंदोलनाचे रुपांतर हिंसाचारात झाले. अनेक ठिकाणी दगडफेक जाळपोळ करण्यात आली. त्यामुळे आसाममध्ये कर्फ्यू लावण्यात आला. तसंच तिथली इंटरनेट सुविधा देखील बंद करण्यात आली. मात्र आता हळूहळू परिस्थिती पूर्वपदावार येत असल्याने कर्फ्यू हटवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. तसंच इंटरनेट सुविधा देखील पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. ११ डिसेंबरपासून लागू करण्यात आलेल्या कर्फ्यू मंगळवारी सकाळी सहा वाजता हटवण्यात आला आहे. कायदा-सुव्यवस्थेच्या फेर आढाव्यानंतर आसामच्या मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला आहे.

मंगळवारपासून कर्फ्यू हटवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेत असल्याचं मंत्री हेमंत बिस्वा सरमा यांनी सांगितलं. त्यांनी ट्विट करून यासगळ्याची माहिती दिली.

आसामसह ईशान्य भारतात देखील या कायद्या विरोधात अजूनही आंदोलनाची धग कायम आहे. या सर्व प्रकारामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. तसंच गुवाहाटीमध्ये देखील संचारबंदीला न जुमानता नागरिकांनी रस्त्यावर उतरून आंदोलने केली.

नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला दोन्ही संसदेच्या सभागृहात मंजूर झाल्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या विधेयकाला मान्यता दिली. त्यामुळे या विधेयकाचे कायद्यात रुपांतर झाले म्हणून आसाममध्ये आंदोलनाने रौद रुप धारण केले होते. या आंदोलनामुळे वाहतूक सुविधा बंद करण्यात आली आणि त्यामुळे अनेक प्रवासी अडकून पडले. मात्र आता सर्व परस्थिती पूर्वपदावार आली आहे.


हेही वाचा – जामिया प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी