घरदेश-विदेशपुलवामामध्ये चकमक; ६ दहशतवाद्यांचा खात्मा

पुलवामामध्ये चकमक; ६ दहशतवाद्यांचा खात्मा

Subscribe

कुख्यात दहशतवादी जाकिर मुसा या दहशतवादी संघटनेचा डेप्युटी चीफ सोलिहाला ठार करण्यात जवानांना यश आले आहे. दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.

जम्मू-काश्मीरच्या पुलवामामधील त्रालमध्ये दहशतवादी आणि जवानांमध्ये चकमक सुरु आहे. या चकमकीत जवानांना मोठे यश आले आहे. या चकमकीत सहा दहशतवाद्यांना ठार करण्यात जवानांना यश आले आहे. सध्या घटनास्थळी सर्च ऑपरेशन सुरु आहे. अवंतीपोरा भागामध्ये दहशतवादी लपून बसल्याची माहिती जवानांना मिळाली होती. या माहितीच्या आधारावर जवानांनी घटनास्थळी धाव घेत सर्च ऑपरेशनला सुरुवात केली. दरम्यान दहशवादी आणि जवानांमध्ये चकमक झाली. या चकमकीत ६ दहशतवाद्यांचा खात्मा करम्यात जवानांना यश आले आहे. यामध्ये कुख्यात दहशतवादी जाकिर मुसा या दहशतवादी संघटनेचा डेप्युटी चीफ सोलिहाला ठार करण्यात जवानांना यश आले आहे. दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.

- Advertisement -

दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळताच जवानाची ४४ राष्ट्रीय रायफल्स, सीआरपीएफची १८० बटालियन आणि जम्मू-काश्मीर पोलिसांची एसओजी टीमने अवंतीपोरा येथे संयुक्त शोध मोहिम सुरु केली. जशी जवानांची टीम घटनास्थळी पोहचली तसेच त्याठिकाणी लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबाराला सुरुवात केली. जवानांनी देखील याला चोख प्रत्युत्तर दिले. या चकमकीत सहा दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले. या चकमीत जाकिर मूसाच्या जवळचा साथिदार मारला गेल्याची माहिती मिळाली आहे. या चकमकीत जाकिर मूसा या दहशतवादी संघटनेचा डेप्युटी चीफ सोलिहा उर्फ रेहान खानला ठार करण्यात जवानांना यश आले आहे. मूसा जम्मू-काश्मीरमध्ये सक्रिय असलेल्या अल-कायदाच्या नविन शाखा अंसार गजवत-उल-हिंदचा प्रमुख आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -