घरदेश-विदेश'राहुल गांधी, आधी जम्मू-काश्मीरची परिस्थिती पाहा मग बोला'

‘राहुल गांधी, आधी जम्मू-काश्मीरची परिस्थिती पाहा मग बोला’

Subscribe

जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी राहुल गांधी यांना खडेबोल सुनावले आहे. 'राहुल गांधींनी काश्मीरमधील सध्याची परिस्थिती पाहावे, मग बोलावे', असे मलिक म्हणाले आहेत.

जम्मू-काश्मीरमधील ३७० कलम रद्द करण्याचे विधेयक राज्यसभेत आणि लोकसभेत मंजूर झाल्यानंतर काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली होती. या टीकेला जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी प्रत्युत्तर दिले आहे. यावेळी मलिक यांनी ‘राहुल गांधींनी जम्मू-काश्मीरची सद्याची परिस्थिती बघून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करावी’, असे म्हटले आहे. याशिवाय जम्मू-काश्मीरची परिस्थिती पाहण्यासाठी राहुल गांधींनी जम्मू-काश्मीरचा दौरा करावा, असा सल्लाही सत्यपाल मलिक यांनी दिला आहे. ‘या दौऱ्यासाठी आम्ही विशेष विमान पाठवतो’, असेही मलिक म्हणाले आहेत.

हेही वाचा – मृत्यूशी झुंजणाऱ्या आईला ५० हजारात विकायची आहेत मुलं

- Advertisement -

‘राहुल गांधींना बेजबाबदार वक्तव्य शोभत नाही’

सत्यपाल मलिक म्हणाले की, ‘सांप्रदायिक दृष्टीकोनाचा विचार करुन जम्मू-काश्मीरमधील ३७० कलम रद्द करण्यात आले आहे. मात्र राहुल गांधी याविषयावरुन टीका करत आहेत. काश्मीरमधील सध्याची परिस्थिती पाहण्यासाठी मी राहुल गांधींना काश्मीरमध्ये येण्याचे निमंत्रण देतो. त्यासाठी मी विमानदेखील पाठवतो. राहुल यांनी स्वत: जम्मू-काश्मीरच्या परिस्थितीचा आढावा घ्यावा आणि त्यानंतर बोलावे. तुम्ही एक जबाबदार व्यक्ती आहात. त्यामुळे असले बेजाबदार वक्तव्ये तुम्हाला शोभत नाही.’

हेही वाचा – हिंमत असेल तर समोरून वार करा; सुब्रमण्यम स्वामींचे राहुल गांधींना आवाहन

- Advertisement -

काय म्हणाले होते राहुल गांधी?

राहुल गांधी यांनी ३७० कायद्यावरुन नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर वारंवार टीका केली आहे. शनिवारी संध्याकाळी काँग्रेसच्या दिल्ली येथील मुख्यालयात काँग्रेस कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत काँग्रेसच्या अध्यक्ष निवडीबाबत महत्त्वाची बैठक आयोजित पार पाडली. विशेष म्हणजे या बैठकीला देशभरातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उपस्थित होते. राहुल गांधी काही वेळेसाठी सभेत आले. त्यानंतर निघून गेले. जाताना माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत बैठकीत जम्मू-काश्मीरचा मुद्दा आल्याचे म्हटले. याशिवाय त्या मुद्द्यामुळेच आपण बैठकीत आल्याचे राहुल गांधींनी स्पष्ट केले होते. याशिवाय काश्मीरमध्ये काय सुरु आहे? याची खरी माहिती मोदींनी देशाला द्यायला हवी, असेही ते म्हणाले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -