घरदेश-विदेशJet Airways : जेट एअरवेज पुन्हा एकदा उड्डाणासाठी सज्ज; जाणून घ्या संपूर्ण...

Jet Airways : जेट एअरवेज पुन्हा एकदा उड्डाणासाठी सज्ज; जाणून घ्या संपूर्ण योजना

Subscribe

जेट एअरवेजची बोली जिंकलेल्या समूहाने म्हटले की ते एअरलाइनमध्ये पैसे गुंतवण्यास तयार आहेत

जेट एअरवेजची बोली जिंकलेल्या समूहाने शुक्रवारी म्हटले की ते एअरलाइनमध्ये पैसे गुंतवण्यास तयार आहेत. त्यासाठी त्यांनी कर्ज निराकरण योजनेच्या अंमलबजावणीची प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी केली आहे. मुरारी लाल जालान आणि फ्लोरियन फ्रिशच्या समूहाने त्यांच्या निवेदनात सांगितले की, त्यांनी निराकरण योजनेची अमंलबजावणीची प्रक्रिया वेगाने करण्यासाठी राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण याच्यांशी संपर्क केला आहे. त्यांनी आणखी म्हंटले की जेट एअरवेज २०२२ मध्ये देशांतर्गत सेवा पुन्हा सुरू करण्यावर अधिक काम करत आहे.

दिवाळखोरी आणि दिवाळखोरी कोडच्या (IBC) माध्यमातून चालू झालेल्या कर्ज निराकरण प्रक्रियाद्वारे या समूहातर्फे या योजनेला राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण समितीने (NCLT) गेल्या जूनमध्ये मंजुरी दिली होती. समूहाने सांगितले की मंजूर झालेल्या योजनेनुसार जेट एअरवेजचे माजी कर्मचारी, कामगार आणि कर्ज देणार्‍या संस्थांसह सर्व भागधारकांची थकबाकी भरण्याचा देखील त्यांचा उद्देश आहे. त्यांना आवश्यक आणि गरजू भांडवल मिळाले असून आता निराकरण योजना लवकरच राबवायची असल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisement -

दरम्यान, समूहाने एनसीएलटी समोर केलेल्या एका निवेदनात म्हटले की, २२ डिसेंबर २०२१ पासून ही योजना लागू करण्याचा त्यांचा मुख्य उद्देश आहे. यादरम्यान जेट एअरवेजच्या ऑपरेटिंग प्रमाणपत्राची देखील प्रक्रिया लवकरात लवकर होण्यासाठी पाऊले उचलली जात आहे. ऑपरेटिंग संबधातील मुद्द्यांबाबतीत ते अधिकारी आणि विमानसेवेतील ऑपरेटर यांच्या संपर्कात आहेत. तर समूहाचे प्रमुख सदस्य जालान यांनी म्हंटले की, “आम्ही देशांतर्गत विमानसेवा नवीन वर्ष २०२२ मध्ये लवकरच सुरू करणार आहोत. जेट एअरवेजला नवीन ऊर्जा देण्यासोबतच आम्ही नवीन इतिहास बनवण्याची वाट बघत आहोत. २०१९ मध्ये मोठ्या कर्जाच्या ओझ्यामुळे जेट एअरवेजला आपले उड्डाण बंद करावे लागले होते.”


हे ही वाचा: http://IND vs SA Test Series : के.एल राहुलकडे कसोटी मालिकेत रोहितच्या गैरहजेरीत मोठी जबाबदारी

- Advertisement -

 

MYMAHANAGAR
MYMAHANAGARhttps://www.mymahanagar.com/author/omkar/
ओमकार संकपाळ हे माय महानगर डॉट कॉमसाठी इंटर्नशीप करत असून, क्रीडा विषयात लिखाण करत आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -