घरताज्या घडामोडीLive Update: केंद्रीय मंत्री अमित शाहांनी घेतलं शिर्डी साईबाबाचं दर्शन

Live Update: केंद्रीय मंत्री अमित शाहांनी घेतलं शिर्डी साईबाबाचं दर्शन

Subscribe

केंद्रीय मंत्री अमित शाहांनी घेतलं शिर्डी साईबाबाचं दर्शन,

अमित शाह यांच्यासह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर उपस्थित होते.

- Advertisement -

सातारा जिल्ह्यातील फलटणमध्ये ओमिक्रॉनचा शिरकाव झाला आहे. फलटणमध्ये ३ रुग्ण सापडले आहेत.


मी सहकार जोडायला आलो आहे – अमित शाह

- Advertisement -

मला प्रश्न विचारणाऱ्यांनी स्वतःच्या घरात डोकावून पाहावं – अमित शाह

आता सहकारावर अन्याय होणार नाही – केद्रीय सहकार मंत्री अमित शाहांची राज्य सरकारवर टीका

विरोधी पक्षनेत्यांच्या कारखान्यांना हमी न देणं योग्य राहणार नाही

राज्य सरकारने इथले विषय इथेच सोडवले पाहिजेत

राज्य सरकारने राजकारण सोडून सहकाराकडे पाहावे – अमित शाह


देशातील पहिल्या सहकार परिषदेत बोलताना राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर घणाघात केला आहे.

केंद्राने इथेनॉलचे धोरण केल्यामुळे साखर कारखान्यांचे दिवस पालटले आहेत.

इथेनॉलसंदर्भात सहकार मंत्री अमित शाह यांनी निर्णय घेतले आहेत.

अमित शहांना सहकाराची चांगली जाणीव आहे. अमित शाह चळवळीतून तयार झालेले नेते आहेत.


सहकार मंत्री अमित शाह देशातील पहिल्या सहकार परिषदेसाठी प्रवरा नगरमध्ये दाखल

(थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी इथे क्लिक करा )


अनिल परब शिवसेना प्रमुख असल्यासाखेच वागत आहेत – रामदास कदम (सविस्तर वाचण्यासाठी इथे क्लिक करा)

उदय सामंतांकडून पक्षाशी एकनिष्ठता शिकायची का?

मला उमेदवारी नको मी आधीच जाहीर केलं आहे.

अनिल परब तुमच्या बापाचा मतदारसंघ आहे का? रामदास कदमांचा घणाघात

शिवसेना प्रमुख नक्की कोण आहे. अनिल परब की उद्धव ठाकरे आम्हाला प्रश्न पडला आहे.


रामदास कदम हे ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्यावर बोलणं योग्य नाही अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते उदय सामंत यांनी दिली आहे.


गद्दार कोण? शिवसैनिकांना कळलं पाहिजे – रामदास कदम

अनिल परब शिवसेनेच्या मुळावर उठलेत – रामदास कदम

रामदास कदम यांना संपवण्यासाठी अनिल परब प्रयत्न करतायत – रामदास कदम यांचा आरोप,


संपूर्ण भारताची अस्मिता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची कर्नाटकात विटंबना झाली. त्याचा आम्ही तिव्र शब्दात निषेध करतो. या घटनेचे देशभरात पडसाद उमठत आहेत. सरकारने त्या समाजकंटकांना शोधून काढून त्यांच्यावर तात्काळ कठोर कारवाई करावी.


संपूर्ण देशाची अस्मिता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची बेंगळुरू येथे झालेली विटंबना निषेधार्ह आहे. बेंगळुरूची उन्नती शहाजीराजेंमुळेच झाली याची जाण ठेवली पाहिजे. केंद्र व कर्नाटक सरकारने याची गांभीर्याने दखल घेऊन दोषींवर तातडीने कठोर कारवाई करावी.


देशात मागील २४ तासात ७, १४५ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. कोरोना रुग्णांची संख्या कमी जास्त होत आहे. मागील २४ तासात ओमिक्रॉनचे ११३ रुग्ण देशात आढळले आहेत. तर २८९ लोकांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

बेळगावात कर्नाटक पोलिसांनी आंदोलक कार्यकर्त्यांना घेतलं ताब्यात

बंगळूरुमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे विटंबन केल्यामुळे मराठी भाषिक संतप्त

शिवप्रेमींना कर्नाटक पोलिसांनी घेतलं ताब्यात

शिवरायांना अभिवादन करण्यासाठी जात असताना रोखल


केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. देशातील पहिल्या सहकारी परिषदेला अमित शाह उपस्थिती लावणार आहेत. महाराष्ट्रातील प्रवरा येथे ही सहकार परिषद होणार आहे.


बेळगाव शहरातील संभाजी चौकात पोलिसांचा बंदोबस्त
बंगळूरुमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे विटंबन करण्यात आलं आहे.
घटनेच्या निषेधार्थ मराठि भाषिकांचा बेळगावमध्ये मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाची सुरुवात शिवाजी उद्यान येथून १० वाजता होणार आहे.


शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम आज खुलासा करणार,

रामदास कदम सध्या शिवसेनेमध्ये नाराज असल्याचे बोलले जात आहे. शिवसेनेत त्यांना डावलल गेल्यानं आज ते पत्रकार परिषद घेऊन मोठा खुलासा करणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -