घरताज्या घडामोडीयामुळे कमला हॅरिस यांना म्हटलं जात होत 'फीमेल ओबामा'!

यामुळे कमला हॅरिस यांना म्हटलं जात होत ‘फीमेल ओबामा’!

Subscribe

अमेरिकेत बुधवारी नव्या सरकारची स्थापना झाली आहे. जो बायडेन यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची तर कमला हॅरिस यांनी उपराष्ट्राध्यक्षाच्या पदाची शपथ घेतली. कमला हॅरिस यांनी अमेरिकेची पहिली महिला, पहिली भारतीय, पहिली कृष्णवर्णीय उपराष्ट्राध्यक्ष होऊन एक इतिहास रचला आहे. ‘फीमेल ओबामा’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या हॅरिस पहिल्यांदाच सिनेटच्या सदस्या झाल्या होत्या. नोव्हेंबरमध्ये जिंकल्यानंतर ऐतिहासिक भाषणात कमला हॅरिस यांनी दिवंगत आई श्यामला गोपालन (भारतातील एक कॅन्सर संशोधक आणि नागरी हक्क कार्यकर्त्या) याची आठवण काढत म्हणाल्या होत्या की, ‘आईने आपल्या राजकीय कारकिर्दीत या मोठ्या दिवसासाठी त्यांना तयार केले होते.’

पुढे त्या म्हणाल्या होत्या की, ‘त्या उपराष्ट्राध्यक्ष पदावर बसणाऱ्या पहिला महिला असू शकतात, पण त्या शेवटच्या महिला नाही.’ कमला हॅरिस यांनी अनेक मोठी कामे केली आहेत. त्या सॅन फ्रान्सिस्कोच्या डिस्ट्रिक्ट अटॉर्नी (District Attorney) बनणाऱ्या पहिल्या महिला, पहिल्या भारतीय आणि पहिल्या आफ्रिकी अमेरिकन आहेत. राष्ट्राध्यक्ष निवडणुकीसाठी डेमोक्रेटिक पार्टीकडून उमेदवार असलेले जो बायडेन यांनी ऑगस्टमध्ये उपराष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी कमला हॅरिस यांची निवड केली. एकेकाळी कमला हॅरिस या बायडेन यांच्या प्रतिस्पर्धी होत्या. त्यांनी बायडेन यांच्यावर अनेक आरोप देखील केले आहेत. ५६ वर्षीय हॅरिस तीन सिनेट सदस्या असलेल्या अमेरिकन सदस्यांपैकी एक आहेत. ओबामा यांच्या कार्यकाळात हॅरिस या ‘फीमेल ओबामा’ म्हणून खूप लोकप्रिय होत्या.

- Advertisement -

७ वर्षांच्या असताना हॅरिस यांचे आई-वडील झाले वेगळे

२० ऑक्टोबर १९६४ रोजी कमला हॅरिस यांचा जन्म झाला. हॅरिस यांची आई श्यामला गोपालन १९६०मध्ये भारतातील तामिळनाडूतून यूसी बर्केलेला (UC Berkeley) पोहोचल्या होत्या. तर त्यांचे वडील डोनाल्ड जे.हॅरिस १९६१ मध्ये ब्रिटीश जमैका येथून अर्थशास्त्र विषयात अभ्यास करण्यासाठी यूसी बर्केलेला आले आहेत. या अभ्यासादरम्यान दोघांची भेट झाली आणि मानवाधिकार चळवळींमध्ये भाग घेण्यादरम्यान त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. हायस्कूलनंतर हार्वर्ड न्यूनिव्हर्सिटीत शिकणाऱ्या कमला हॅरिस सात वर्षांच्या होत्या, यावेळेस त्यांचे आई-वडील एकमेकांपासून विभक्त झाले.

कमला आणि त्यांची छोटी मुलगी माया आपल्या आईसोबत राहत होती आणि त्यांच्या आयुष्यावर आईचे जास्त प्रभुत्व आहे. दरम्यान तो काळ कृष्णवर्णीयांसाठी सोपा नव्हता. त्यांच्या आईने त्यावेळेस वारसाबद्दल अभिमान बाळगण्यास शिकवले. त्यांची भारतीय संस्कृतीशी नाळ अधिक घट्ट जोडलेली होती. कमला बायडेन-हॅरिस पब्लिसिटी वेबसाईटवर ‘द ट्रूथ्स वुल्ड होल्ड’ या आत्मचरित्रात लिहिले आहे की, ‘त्यांच्या आईला माहित होते की आपण दोन कृष्णवर्णीय मुलींना वाढवत आहोत आणि नेहमीच त्यांना अशापद्धतीने पाहिले जाईल.’

- Advertisement -

हेही वाचा – अमेरिकेचे ४६ वे राष्ट्राध्यक्ष ठरले जो बायडन, कमला हॅरिस उपराष्ट्राध्यपदी


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -