घरताज्या घडामोडीKargil Vijay Diwas: कारगिल युद्धात काय होती चीनची भूमिका? जाणून घ्या...

Kargil Vijay Diwas: कारगिल युद्धात काय होती चीनची भूमिका? जाणून घ्या भारत पाकिस्तानमध्ये कोणाच्या बाजूने होता चीन

Subscribe

कारगिल युद्धात चीनने छुप्या पद्धतीने पाकिस्तानला मदत करण्याचा प्रयत्न केला होता ही बाब जगजाहीर आहे. मात्र चीनने नेहमीच आम्ही स्वतंत्र विदेश नीतिचे पालन करत असून कोणत्याही देशाच्या प्रश्नामध्ये हस्तक्षेप करत नाही असे वारंवार सांगितले

कारगिल युद्धात भारताच्या झालेल्या विजयाला आज तब्बल २२ वर्षे पूर्ण झाली. देशात आज २६ जुलै हा दिवस कारगिल विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. पाकिस्तानचे त्यावेळचे तात्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या माहितीशिवाय तात्कालीन पाकिस्तानी सेना प्रमुख जनरल परवेज मुशर्रफद्वारे हा संघर्ष पेटला होता. परंतु या सगळ्यात पाकिस्तान आपले ध्येय कधीच साध्य करु शकला नाही. भारतीय सेनेच्या शूरवीरांनी पाकिस्तानी सैन्याला धुळ चारत २६ जुलै रोजी आपल्या सगळ्या चौक्या,प्रदेश परत मिळवल्या. या युद्धात चीनच्या भूमिकेवर अनेक सवाल उपस्थित करण्यात आले होते आणि आजही केले जात आहेत. कारगिल युद्धात चीनची भूमिका ही सर्वांनसमोर प्रश्न उभी करणारी ठरली. कारगिल युद्धात चीनने छुप्या पद्धतीने पाकिस्तानला मदत करण्याचा प्रयत्न केला होता ही बाब जगजाहीर आहे. मात्र चीनने नेहमीच आम्ही स्वतंत्र विदेश नीतिचे पालन करत असून कोणत्याही देशाच्या प्रश्नामध्ये हस्तक्षेप करत नाही असे वारंवार सांगितले आहे. कारगिल युद्धादरम्यान चीनची नेमकी काय भूमिका होती? चीन कोणाच्या बाजूने होते? जाणून घ्या.

चीनच्या तीन महत्त्वाच्या हालचाली

कारगिल युद्धादरम्यान चीनच्या संशयित हालचाली चीन पाकिस्तानला छुप्या पद्धतीने मदत करत असल्याचे संकेत देतात. पूर्व लडाखच्या डेमचोकमध्ये चीनने पहिल्यांदा पेट्रोलिंग उपक्रम वाढवण्यास सुरुवात केली. असे सांगितले जाते की, पीपुल्स लिबरेशन आर्मीच्या ७० पेट्रोल पार्ट्या ६ जून रोजी १९९९ रोजी डेमचोकच्या समोर आल्या होत्या आणि याच दरम्यान भारतात कारगिल युद्धाला सुरुवात करण्यात आली होती.

- Advertisement -

त्यानंतर बीजिंगने लडाखच्या ट्रिग हाइट्सवर १९९९ सालच्या जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आपल्या हालचाली वाढवण्यास सुरुवात केली होती. या ठिकाणी चीनने नैसर्गिक पृष्ठभाग असलेले ट्रँक तयार करण्यास सुरुवात केली होती. चीनने ठरलेल्या क्षेत्रात आपला दावा सिद्ध करण्याचे प्रयत्न सुरु केले होते.

त्यानंतर पँगोंग त्सोमध्ये चीनने युद्धपातळीवर टँक तयार करण्यास सुरुवात केली आणि फार कमी वेळात चीन टँक तयार केले. हे टँक पँगोंग झीलच्या दक्षिण किनाऱ्याच्या स्पंगगुर पर्यंत तयार करण्यात आले होते. या नंतरच चीन  कोणत्याही क्षेत्रात बोट किंवा चालत गस्ती घालण्यासाठी सक्षम झाले होते.

- Advertisement -

 


चीन सतत स्वतंत्र विदेश नीतिचे पालन करत आहोत. भारताला हानी पोहतील असे पाकिस्तानसोबत चीनचे कोणतेही संबंध नाही असा दावा चीन सतत करत होता. मात्र कारगिल युद्धावेळी चीनचा खरा चेहरा वारंवार जगासमोर येत होता. कारगिल युद्धांवेळी चीनच्या प्रमुख तीन हालचाली चीनने आपण तटस्थ असल्याचे सर्व दावे खोडून काढते. भारत पाकिस्तानमध्ये युद्ध सुरु असतेवेळी चीनने लडाखमध्ये आपली पकड मजबूत केली होती. त्याचप्रमाणे पाकिस्तानसोबत राहून भारतात मोठी कारवाई घडवून आणण्याचे प्री प्लानिंग देखील करत होता. मात्र या सगळ्यात चीन कुठेही यशस्वी होऊ शकला नाही.


हेही वाचा – हिमाचल प्रदेशात पर्यटनासाठी गेले असता दरड कोसळून नागपूरच्या तरुणीसह 9 जणांचा मृत्यू

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -