घरदेश-विदेशVIDEO: मृत 'पत्नी'सह उद्योजकाचा स्वप्नवत गृहप्रवेश! पाहुणे झाले सैरभेर...

VIDEO: मृत ‘पत्नी’सह उद्योजकाचा स्वप्नवत गृहप्रवेश! पाहुणे झाले सैरभेर…

Subscribe

कर्नाटकातले उद्योगपती श्रीनिवास गुप्ता यांनी आपल्या नव्या घराचा गृहप्रवेश सोहळा आपल्या पत्नीच्या पुतळ्यासोबत पूर्ण केला

एकीकडे जगभरात कोरोनाचा कहर सुरू असताना दिवसेंदिवस लोकं कोरोना रूग्णांचा आकडा वाढत आहे. तर दुसरीकडे कोरोना महामारीच्या संकटादरम्यान चेहऱ्यावर हासू निर्माण करणारी घटना कर्नाटकातून समोर आली आहे. कर्नाटकचे उद्योगपती श्रीनिवास गुप्ता यांनी नुकतेच आपल्या नव्या बंगल्यात गृहप्रवेश केला. मात्र हा गृहप्रवेशाची देशभरात चर्चा केली जात आहे. याचे कारण म्हणजे श्रीनिवास यांनी नव्या घरात आपल्या पत्नीच्या मेणाच्या पुतळ्यासह प्रवेश केला.

जुलै २०१७ मध्ये त्यांची पत्नी माधवी यांचे कार अपघातात निधन झाले. पत्नीची आठवण सोबत असावी आणि तिचे स्वप्न पूर्ण व्हावे, यासाठी हा पुतळा तयार केला. हा मेणाचा पुतळा जशाच तसा दिसत आहे. या पुतळ्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

- Advertisement -

‘पत्नी’सह उद्योजकाचा स्वप्नवत गृहप्रवेश!

तीन वर्षांपूर्वी माधवी आपल्या मुलींसोबत तिरुपतीला जात असताना, त्यांचा अपघात झाला. या घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. माधवी यांचे स्वप्न होते की, आपला एक बंगला असावा. अखेर श्रीनिवास यांनी तीन वर्षांनी आपल्या पत्नीचे स्वप्न पूर्ण केले. एवढेच नाही तर आपले कुटुंब पूर्ण करण्यासाठी आपल्या पत्नीचा मेणाचा पुतळाही त्यांनी तयार केला. या पुतळ्यासह श्रीनिवास गुप्ता यांनी नवीन घरात गृहप्रवेश केला.

- Advertisement -

‘माझ्या पत्नीला पुन्हा माझ्या घरात पाहून मला आनंद झाला, असे श्रीनिवास गुप्ता यांनी सांगितले तर बंगळुरूचे कलाकार श्रीधर मूर्ती यांनी जवळपास वर्षभराच्या मेहनतीनंतर गुप्ता यांच्या पत्नीचा मेणाचा पुतळा उभा केला आहे. यासाठी सिलिकॉनचाही वापर करण्यात आलाय. अगोदर केवळ मेणाचा पुतळा बनवण्याचा विचार आला होता. परंतु, इथे गरम वातावरण असल्यानं कलाकारांनी सिलिकॉनच्या पुतळ्याची कल्पना समोर मांडली, अशी माहिती ही श्रीनिवास यांनी दिली आहे.


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -