Sushant Sucide Case: रिया चक्रवर्तीला अभिनेत्री स्वरा भास्करचा पाठिंबा ट्वीट करत म्हणाली…

swara bhaskar

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात सुशांतच्या वडिलांनी रियावर आर्थिक घोटाळ्याचे आरोप केल्यानंतर अभिनेत्री रिया चक्रवर्तीची चौकशी सुरू आहे. त्यामुळे रियावर सोशल मीडियावरूनही मोठ्याप्रमाणावर टीका होत आहे. या पार्श्वभूमीवर रियाने माध्यमांविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. केवळ चाहते नाही तर बॉलिवूडमधील अनेक कलाकरांनी रियावर नाराजी व्यक्त केली आहे. मात्र या सगळ्यात अभिनेत्री स्वरा भास्करने रियाला पाठिंबा दिला आहे.

रिया विरोधात अफवा पसरवणाऱ्या माध्यमांवर कोर्टाने कारवाई करावी अशी मागणी तिने केली आहे. “रियाला एका विचित्र आणि धोकादायक मीडिया ट्रायलचा सामना करावा लागत आहे. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकाराकडे गांभिर्याने लक्ष द्यावं. तसंच खोट्या बातम्या पसरवणाऱ्या माध्यमांवर कारवाई करावी.” अशा आशयाचं ट्विट करुन स्वराने केलं आहे.

सध्या सोशल मीडियावर स्वरा भास्करच्या याच ट्विटची चर्चा आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यामुळे रियाबरोबर नेटकऱ्यांनी स्वरा भास्करलाही ट्रोल करायला सुरूवात केली आहे. सोशल मीडियावर स्वरा भास्कर ट्रोल होणं ही काही पहिली वेळ नाहीये. या आधी अनेकदा वेगवेगळ्या मुद्द्यांवरून स्वराला नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे.


हे ही वाचा – गोधन न्याय योजनेचा पडला भार, शंभर किलो शेण घेऊन चोर पसार!