घरताज्या घडामोडीKarnataka Hijab Row: हिजाब वादादरम्यान कर्नाटकात आजपासून १० वी पर्यंतचे वर्ग झाले...

Karnataka Hijab Row: हिजाब वादादरम्यान कर्नाटकात आजपासून १० वी पर्यंतचे वर्ग झाले सुरू

Subscribe

सध्या कर्नाटकमध्ये १०वी नंतरचे उर्वरित वर्ग सुरू केले नाहीत. राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर १०वी नंतरचे उर्वरित वर्ग सुरू केले जातील, अशी माहिती कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी दिली.

कर्नाटकातील हिजाब वादाचे (Karnataka Hijab Row) पडसाद देशभरातील ठिकठिकाणी पाहायला मिळाला. कर्नाटकातील कॉलेजमध्ये हिजाबवर बंदी घातल्यामुळे मोठ्या प्रमाणात विरोध झाला आणि याबाबत राजकीय विधाने, आंदोलन अजूनही सुरू आहेत. यादरम्यान कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आजपासून राज्यभरातील १०वी पर्यंतच्या शाळा सुरू करण्याची घोषणा दिली. हिजाब वादादरम्यान कर्नाटकातील विद्यार्थी शाळेत जाताना दिसत आहेत. याबाबत उडुपी जिल्ह्याचे तहसीलदार म्हणाले की, ‘विद्यार्थी शाळेत येत आहेत. परिस्थिती शांत आहे. जिल्हा प्रशासन उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत आहे.’ दरम्यान उडुपी जिल्ह्यातील १९ फेब्रुवारीपर्यंत कलम १४४ लागू करण्यात आला आहे.

- Advertisement -

गेल्या महिन्यात उडुपीमध्ये सरकारी प्री-युनिव्हर्सिटी वीमेंस कॉलेजमध्ये हिजाब विरोधात आंदोलन सुरू झाले होते. ज्यांचा विरोध संपूर्ण देशभरात होऊ लागला आणि आता देशभरात हिजाब वादामुळे खळबळ माजली आहे. कर्नाटकात हिजाब वादावर उच्च न्यायालयाचा आदेश आल्यानंतर राज्य सरकारने शाळा सुरू करण्यात आदेश दिला. १ली ते १०वी पर्यंतच्या शाळा आजपासून सुरू करण्याचा आदेश राज्य सरकारने दिला. रविवारी हुबळीमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी १०वीपर्यंत शाळा सुरू करण्याबाबत घोषणा केली. शिवाय शाळा सुरू झाल्यानंतर शाळेत शांतता पाळण्याचे आवाहनही त्यांनी केले.

शाळा सुरू करण्याची घोषणा केल्यानंतर मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी राज्यातील सर्व जिल्हांच्या जिल्हाधिकाऱ्यांची, पोलीस अधीक्षकांची आणि इतर अधिकाऱ्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली. सध्या कर्नाटकमध्ये १०वी नंतरचे उर्वरित वर्ग सुरू केले नाहीत. राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर १०वी नंतरचे उर्वरित वर्ग सुरू केले जातील. शाळा प्रशासन डीसी आणि एसपी यांना शांती समितीची बैठक आयोजित करण्याचे निर्देश बोम्मई यांनी दिले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – महत्वाचे काय आहे? देश की धर्म?


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -