घरदेश-विदेशकेरळ नन रेप केस; मुख्य साक्षीदाराचा जालंधरमध्ये संशयास्पद मृत्यू

केरळ नन रेप केस; मुख्य साक्षीदाराचा जालंधरमध्ये संशयास्पद मृत्यू

Subscribe

फादर कुरियाकोस कट्टूथारा यांचा सोमवारी पंजाबमधील जालंधरमध्ये मृतदेह आढळला आहे. त्यांच्या मृत्यूमुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा तपास जालंधर पोलीस करत आहेत.

केरळच्या बहुचर्चित नन रेप आणि हत्या प्रकरणातील आरोपी बिशन फ्रैंको मुलक्कलच्याविरोधात साक्ष देणारा मुख्य साक्षीदाराचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. फादर कुरियाकोस कट्टूथारा यांचा सोमवारी पंजाबमधील जालंधरमध्ये मृतदेह आढळला आहे. कुरियाकोस ६२ वर्षाचे होते. जालंधर येथील दसुयातील सेंट. मेरी चर्चमध्ये ते राहत होते. त्याठिकाणावरुनच त्यांचा संशयास्पद अवस्थेत मृतदेह ताब्यात घेण्यात आला आहे. कुरियाकोस यांच्या शरीरावर काहीच जखमा सापडल्या नाहीत. मात्र त्यांचा मृतदेह ज्या ठिकाणी सापडला तिथून ब्लड प्रेशरच्या गोळ्या सापडल्या आहेत. तसंच त्यांच्या बिछान्यावर उल्टी केल्याचे पोलिसांना आढळले. याप्रकरणाचा तपास सुरु आहे. बिशप फ्रँको मुलक्कलच्या विरोधात साक्ष दिल्यामुळेच फादर कुरियाकोस कट्टूथारा यांची हत्या करण्यात आली असल्याचा आरोप त्यांचे भाऊ जोस कट्टूथारा यांनी केला आहे.

- Advertisement -

आरोपी जालंधरमध्ये होता

केरळ नन रेप प्रकरणातील आरोपी बिशप याला १५ ऑक्टोबरला केरळ हायकोर्टाने सशर्त जामिनावर सुटका केली होती. केरळ हायकोर्टाने काही शर्थी लावल्या आहेत ज्यामध्ये बिशप फ्रैंको मुलक्कलला केरळमध्ये प्रवेश करण्याची परवानगी दिली जाणार नाही. याव्यतिरिक्त विशप मुलक्कलला आपला पासपोर्ट देखील कोर्टामध्ये सरेंडर करावा लागेल. जामीन मिळाल्यानंतर मुलक्कल १७ ऑक्टोबरला जांधरला गेला होता. त्याच्या जालंधरला गेल्यानंतर ५ दिवसाने फादर कुरियाकोस कट्टूथारा यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

- Advertisement -

केरळ दौऱ्यावर असताना केले बलात्कार

२०१४ ते २०१६ यादोन वर्षामध्ये ननवर बलात्कार केल्याचा आरोपी बिशप फ्रैंको मुलक्कलवर आरोप आहेत. फ्रैंको मुलक्कलला कोर्टाने दोन आठवड्यांची न्यायलयीन चौकशी सुनावली आहे. बिशप फ्रँको केरळच्या दौऱ्यावर असताना त्यांनी ननवर बलात्कार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. बिशपफ्रैंको मुलक्कला व्हॅटिकनने प्रमुखपदावरुन हटवले आहे. बिशप फ्रँको मुलक्कलने व्हॅटिकनकडे आपल्याला जबाबदाऱ्यांतून मुक्त करण्याची विनंती केली होती. त्यांनी पोप फ्रान्सिस यांना पत्र लिहून काही काळासाठी पदमुक्त करण्याची परवानगी मागितली होती.

मृत्यू प्रकरणी तक्रार दाखल

केरळ नन रेप प्रकरणातील मुख्य साक्षीदार फादर कुरियाकोस कट्टूथारा यांच्या संशयास्पद मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबियांनी पोलीसात तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणाची चौकशी केली जावी अशी मागणी करण्यात आली आहे.

ननने केले आहेत हे आरोप

नन रेप प्रकरणातील आरोपी मलक्कलविरोधात ननने आरोप केला आहेत की, २०१४ मध्ये कुरविलांगडमध्ये एका गेस्ट हाऊलमध्ये आरोपीने बलात्कार केला होता. त्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी लैंगिक शोषण करण्यात आले. ननन असे देखील सांगितले की, चर्चच्या अधिकाऱ्यांनी जेव्हा तक्रार दाखल केली तेव्हा काहीच पाऊल उचलण्यात आले नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -