घरताज्या घडामोडीWest Bengal: तृणमूल नेत्याच्या हत्येनंतर बंगालमध्ये भडकली हिंसा, १० जणांचा मृत्यू

West Bengal: तृणमूल नेत्याच्या हत्येनंतर बंगालमध्ये भडकली हिंसा, १० जणांचा मृत्यू

Subscribe

बंगालच्या बीरभूम जिल्ह्यातील रामपूरहाट भागात सत्तेत असलेल्या तृणमूल काँग्रेसच्या ताब्यातील बरशल ग्राम पंचायतीचे उपप्रमुख भादू सेख यांची काल, सोमवारी हत्या झाली. त्यानंतर बंगालमध्ये हिंसा भडकली असून जाळपोळीच्या मोठ्या घटना घडत आहेत. नेत्याच्या हत्येमुळे संतप्त असलेल्या टीएमसीच्या समर्थकांनी घटनेच्या काही तासानंतर संशयितांच्या घरात आग लावली. यामध्ये १० जणांचा जळून मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेतले आहेत. या घटनेमुळे परिसरात तणावचे वातावरण पसरले आहे. जिल्ह्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून परिसरात तणावाचे वातावरण पाहून अतिरिक्त पोलीस दल तैनात करण्यात आले आहेत. पोलीस सुत्रांच्या माहितीनुसार, राजकीय वैराचे प्रकरण आहे.

एएनआयच्या माहितीनुसार, काल रात्रीची घटना आहे. १० ते १२ घर जळाली आहेत, ज्यामध्ये एकूण १० लोकांचा मृत्यू झाला आहे. यांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत. एका घरातील ७ जणांचे मृतदेह काढण्यात आहेत.

- Advertisement -

बंगाल राष्ट्रपती राजवटच्या दिशेने

दरम्यान या हिंसेनंतर मंत्री फिरहाद हकीम यांच्या नेतृत्वात तृणमूल काँग्रेसचे तीन आमदाराऱ्यांच्या प्रतिनिधी मंडळला घटनास्थळी पाहणी करण्यासाठी पाठवण्यात आले आहे. हे प्रतिनिधी मंडळ पीडित कुटुंबियांची भेट घेतील. दुसऱ्या बाजूला या हिसेंला विरोधीपक्ष भाजपने विरोध केला आहे. या मुद्द्यावरून तृणमूल काँग्रेसला त्यांनी घरले आहे. बंगालचे भाजपचे मुख्य प्रवक्ते शमिक भट्टाचार्य म्हणाले की, ‘या घटनेने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की, बंगालमध्ये कायद्याचे राज्य नाही तर राज्यकर्त्याचे राज्य आहे. तृणमूलच्या गुंडांना कायद्याची आणि प्रशासनाची कोणतीही भीती नाही. त्यामुळे अशा प्रकारची घटना राज्यात घटना घडली आहे. बंगाल राष्ट्रपती राजवटच्या दिशेने जात आहे.’

- Advertisement -

हेही वाचा – Akhilesh Yadav Resign: अखिलेश यादव यांनी लोकसभेच्या सदस्यत्वाचा दिला राजीनामा


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -