घरताज्या घडामोडीमोबाईल, बाईक घेण्यासाठी बापाने ३ महिन्यांच्या मुलीला १ लाखात विकले!

मोबाईल, बाईक घेण्यासाठी बापाने ३ महिन्यांच्या मुलीला १ लाखात विकले!

Subscribe

एका शेतकरी मजुराने आपल्या नवजात ३ महिन्यांच्या चिमुकलीला विकून मोबाईल फोन आणि मोटार सायकल खरेदी केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना कर्नाटकातील चिक्काबल्लापूर जिल्ह्यातील तिनाकल गावात घडली आहे. दरम्यान राज्य सरकारच्या आणि बालकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी या चिमुकलीला वाचवले आहे. याप्रकरणी मुलीच्या वडिलांचा शोध सुरू असून आईला ताब्यात घेण्यात आले आहे.

माहितीनुसार, मुलीचा जन्म झाल्यावर तिच्या आई-वडिलांनी १ लाख रुपयात तिला बेंगळुरूमधील काही लोकांना विकण्याचा प्रयत्न केला. परंतु बेंगळुरूमधल्या रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी त्याचा हा प्लॅन नाकाम केला. दरम्यान त्याचा या प्लॅनची माहिती एका व्यक्तीला मिळाली. मग त्याने एका शेजारीला खेड्यातील काही निःसंतान जोडप्याच्या वतीने त्यांच्याशी करारा केला. आई-वडिलांनी त्या मुलीला १ लाख रुपयाते विकले.

- Advertisement -

त्या ३ महिन्यांच्या मुलीला विकल्यानंतर त्या आरोपी वडिलांना १५ हजार रुपयांचा मोबाईल फोन आणि ५० हजार रुपयांची एक मोटारसायकल खरेदी केली. यामुळे त्याच्या शेजाऱ्यांना त्याच्यावर संशय आला. त्यांना समजले की त्याची नवजात मुलगी हरवली आहे. याबाबत मग त्यांनी गावातील अधिकऱ्यांना याबाबत माहिती दिली. ज्यानंतर त्या मुलीच्या आईसह गावकऱ्यांनी चौकशी केली. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, ही मुलगी मान्चेनाहाल्ली गावच्या एका निःसंतान दाम्पत्याला विकले गेले होते.

अधिकाऱ्यांना या चिमुकलीची माहिती कळताच जिल्ह्यातील दत्तक केंद्राकडे तिला सुपूर्द केले. दरम्यान सुटका झालेल्या नवजात मुलीच्या आईने अधिकाऱ्यांना दिलेल्या माहितीनुसार, मुलीला विकण्यासाठी पतीने तिला धमकावले होते. दरम्यान बाल कल्याण समिती मंगळवारी याबाबत निर्णय घेईल. सध्या मुलीच्या वडिलांना पकडण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – धक्कादायक! मासे पकडायला गेलेल्या सख्ख्या भावांचा आईसमोरच बुडून मृत्यू!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -