Lakhimpur violence : मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना ४५ लाख रुपयांसह सरकारी नोकरी, तर जखमींना १० लाख मदत जाहीर

सदर घटनेची चौकशी हायकोर्टाच्या सेवानिवृत्त न्यायमूर्तींच्या अंतर्गत न्यायालयीन चौकशी व्हावी.

Lakhimpur violence Yogi Government announce 45 lakh help and job to family member
Lakhimpur violence : मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना ४५ लाख रुपयांसह सरकारी नोकरी, तर जखमींना १० लाख मदत जाहीर

लखीमपुर खेरीमध्ये झालेल्या हिंसाचारात एकूण ९ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. शेतकरी आंदोलनादरम्यान केंद्रीय मंत्र्याच्या मुलाने शेतकऱ्यांवर गाडी घातल्यामुळे जागीत ३ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला तर उपचारादरम्यान काही शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. या हिंसाचारात मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना ४५ लाख रुपये आणि एका सदस्याला सरकारी नोकरीमध्ये घेण्यात येईल तसेच जखमींना १० लाख रुपयांची मदत करण्यात येणार असल्याची घोषणा योगी सरकारकडून करण्यात आली आहे. शेतकरी आणि अधिकाऱ्यांमध्ये सलग सहा वेळा चर्चा झाली यानंतर हा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी शेतकर्यांकडून करण्यात आली आहे.

उत्तर प्रदेशमधील लखीमपुर खीरी या भागात शेतकऱ्यांनी उत्तर प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले यावेळी ताफ्यात सहभागी असलेल्या केंद्रीय मंत्र्यांच्या मुलाने शेतकऱ्यांवर गाडी घातली यामध्ये जागीच ३ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी दोन गाड्या पलटी करुन पेटवून दिल्या आहेत. तसेच जखमी शेतकऱ्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु उपचारादरम्यान काही शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे.

शेतकरी नेते आणि राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत आणि योगी सरकारचे अधिकारी एडीजी लॉ एंड ऑर्डर प्रशांत कुमार आणि अपर मुख्य सचिव देवेश चतुर्वेदी यांच्यात बैठकीचे फेरे झाले. या बैठकीमध्ये योगी सरकारकडून मदत जाहीर करण्यात आली आहे.

योगी सरकारकडून मदत जाहीर

उत्तर प्रदेशमधील योगी सरकारने हिंसाचारात मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांना मदत जाहीर केली आहे. शेतकरी आणि अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या बैठकांनंतर या मदतीवर एकमत झालं आहे. यामध्ये ज्या शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे त्यांच्या कुटुंबीयांना ४५ लाख रुपये तर जखमी असलेल्या शेतकऱ्याला १० लाख रुपये मदतनीधीची घोषणा करण्यात आली आहे. तसेच मृत्यू झालेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबीयातील सदस्याला सरकारी नोकरी देण्यात येणार आहे.

शेतकऱ्यांच्या मागणीवर एकमत

– सदर घटनेची चौकशी हायकोर्टाच्या सेवानिवृत्त न्यायमूर्तींच्या अंतर्गत न्यायालयीन चौकशी व्हावी.
– ज्या शेतकऱ्यांचा मृत्यू झालाय त्यांच्या कुटुंबीयांतील एका सदस्याला त्याच्या पात्रतेनुसार सरकारी नोकरी देण्यात यावी.
– मृतांच्यु कुटुंबीयांना ४५ लाख तर जखमींना १० लाखांची मदत करण्यात यावी.
– हिंसाचाराच्या प्रकरणात ज्यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्याची कायदेशीर चौकशी व्हावी.


हेही वाचा : शेतकऱ्यांवर गाडी चढवल्याप्रकरणी केंद्रीय राज्य मंत्र्याच्या मुलावर गुन्हा दाखल, ९ जणांचा मृत्यू