घरदेश-विदेशलालूप्रसाद एम्समध्ये भरती, प्रकृती स्थिर असल्याची माहिती

लालूप्रसाद एम्समध्ये भरती, प्रकृती स्थिर असल्याची माहिती

Subscribe

राष्ट्रीय जनता दल (RJD) अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांना बुधवारी रात्री उशिरा पाटणा येथून दिल्ली येथे विमानाने नेण्यात आले. त्यांना ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्समच्या (एम्स) आपत्कालीन विभागात दाखल करण्यात आले आहे.

राष्ट्रीय जनता दल (RJD) अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांना बुधवारी रात्री उशिरा पाटणा येथून दिल्ली येथे विमानाने नेण्यात आले. त्यांना ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्समच्या (एम्स) आपत्कालीन विभागात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ते व्हेंटिलेटरवर असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

एम्स येथे वरिष्ठ डॉक्टरांचे पथक त्यांच्यावर उपचार करत आहे. तत्पूर्वी ते पाटणा विमानतळावरून रात्री ९ वाजता एअर अॅम्ब्युलन्सने दिल्लीला रवाना झाले होते. त्यांच्यासोबत त्यांची मुलगी मीसा भारतीही होती. काही दिवसांपूर्वी पाटणा येथील त्यांच्या घराच्या पायऱ्यांवरून खाली घसरल्याने त्यांच्या उजव्या खांद्याला फ्रॅक्चर झाले होते, त्यानंतर त्यांना पाटणा येथील खासगी रुग्णालयात आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. आता तेथून त्यांना पुढील उपचारासाठी एम्समध्ये आणण्यात आले आहे.

- Advertisement -

नितीश कुमार यांनी लालू प्रसाद यादव यांची प्रकृती जाणून घेण्यासाठी पाटण्यातील पारस हॉस्पिटल गाठले होते. याच्या एक दिवस आधी मुख्यमंत्र्यांनी तेजस्वी यादव यांनाही फोन केला होता. त्यांनी आरजेडी सुप्रिमोची स्थिती जाणून घेतली होती. यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही फोनद्वारे लालू प्रसाद यादव यांची प्रकृती बाबच माहिती जाणून घेतली आहे. त्यानंतर कुटुंबाची चिंता पाहून लालू यादव यांना दिल्लीतील एम्समध्ये दाखल करण्यात आले आहे.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -