घरCORONA UPDATEलालू प्रसाद यादव यांच्यावर कोरोनाचं सावट; सुरक्षा रक्षक कोरोना पॉझिटिव्ह

लालू प्रसाद यादव यांच्यावर कोरोनाचं सावट; सुरक्षा रक्षक कोरोना पॉझिटिव्ह

Subscribe

आरजेडीचे सर्वेसर्वा लालू प्रसाद यादव यांच्यावर कोरोनाचं सावट वाढलं आहे. त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लालू यादव यांच्या संरक्षणासाठी पोलीस तैनात करण्यात आले होते. त्यांच्यामध्ये कोरोना संसर्ग कसा झाला हे अद्याप समजू शकलेले नाही. चारा घोटाळ्याप्रकरणी दोषी ठरलेला लालू प्रसाद सध्या गंभीर आजारावर रिम्समध्ये उपचार घेत आहेत.

लालू प्रसाद यादव हे बिरसा जेलमध्ये शिक्षा भोगत आहेत. दरम्यान, गंभीर आजारांमुळे त्यांना रिम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्याचा वार्ड रिम्समधील कोविड वॉर्ड जवळ आहे. यामुळे त्यांना यापूर्वी संसर्गाच्या धोका असल्याचं बोललं जात होतं. दरम्यान, आता त्यांच्या संरक्षणासाठी तैनात करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याने लालू यांच्यावर कोरोनाचं सावट आहे. पोलिस कर्मचारी सुखदेवनगर पोलिस ठाण्याचा असल्याचं सांगण्यात येत आहे. ते लालूंच्या संरक्षणासाठी तैनात होते. तथापि, सुट्टी घेऊन हा पोलीस कर्मचारी त्याच्या गावी बिहारमध्ये गेला होता, असंही सांगितलं जात आहे. गावातून परत आल्यानंतर कोरोनाची चाचणी करण्यात आली. चाचणी अहवालात कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं. लालू प्रसाद यादव यांना आधीच कोरोनाचा धोका होता. त्याच्या संरक्षणासाठी तैनात असलेल्या पोलिस कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर आता हा धोका आणखीनच वाढला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – ‘आता मोदींनी देशाची माफी मागावी’; चिनी सैन्य माघारी परतताच काँग्रेसची मागणी


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -