Live Update: सध्या महाराष्ट्रात ३० हजार ५२५ सक्रीय रुग्ण

coronavirus udpate 23 october 2021 weather ananya pandey cruise drugs case ncb theatres reopens T20 world cup 2021
coronavirus udpate 23 october 2021 weather ananya pandey cruise drugs case ncb theatres reopens T20 world cup 2021

महाराष्ट्रात गेल्या २४ तासांत २ हजार ६९ नवे कोरोनाबाधित आढळले असून ४३ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तसेच ३ हजार ६१६ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आता राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ६५ लाख ८१ हजार ६७७वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १ लाख ३९ हजार ६२१ जणांचा मृत्यू झाला असून ६४ लाख ७ हजार ९३६ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच सध्या राज्यात ३० हजार ५२५ सक्रीय रुग्ण आहेत.


भाजपच्या कोअर कमिटीची बैठक संपली. भाजपच्या संघटनात्मक कामाचा आढावा घेतला आहे. तसेच आगामी महापालिका निवडणुकी संदर्भात बैठकीत चर्चा करण्यात आली.


मुंबईत गेल्या २४ तासांत ४२५ नवे कोरोनाबाधित आढळले असून २ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तसेच ४०० जण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईतील आता एकूण कोरोनाबाधितांची संख्या ७ लाख ४८ हजार ५९३वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १६ हजार १६४ जणांचा मृत्यू झाला असून ७ लाख २४ हजार ८२१ जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या मुंबईत ५ हजार ९८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.


राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार उद्या, बुधवारी दुपारी २ वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत.


महाराष्ट्राला फक्त ३० टक्के गॅस पुरवठा, कोल इंडियाच्या ढिसाळ कारभारामुळे महाराष्ट्रात कोळशाचा तुटवडा झाल्याची माहिती ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिली आहे. नितीन राऊत यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे

  • राज्याला मिळणारा कोळसा अपेक्षित दर्जाचा नाही
  • कोळश्याच्या साठ्यात सुधार होतेय
  • कोळसा टंचाई असतानाही २७ पैकी ७ संच बंद
  • राज्यात अचानक विजेची मागणी वाढली, यामुळे कोळसाचा साठा कमी
  • विजेचा काटकसरीने वापर करावा लागणार
  • कोळसा पुरवठ्यासाठी १ हजार कोटी देण्याचे निर्देश, केंद्रीय मंत्र्यांना पाठवले पत्र
  • सध्या राज्यात कुठेही लोडशेडिंग नाही
  • कोळशा अभावी ३५ हजार मेगा व्हॅट विजेचा तुटवडा

मनसे नेते बाळा नांदगावकर देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला


महाराष्ट्रात ओबीसींची परवड का? संतांच्या महाराष्ट्रात ओबीसींची अशी अवस्था का? जातीपातींचे राजकारण आजच्या तरुणांना मान्य नाही. ज्यांची संख्या जास्त ते बहुजन – पंकजा मुंडे


समीर वानखेडेंवर पाळत ठेवत असतील तर ही गंभीर बाब – देवेंद्र फडणवीस


राज्यात २४ तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली असून या भागात ढगांच्या गडगडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे. तर शनिवारी विदर्भातील काही भागातही पाऊस होण्याची शक्यता आहे.


मुंबईकरांना चकाचक रस्ते मिळणार का? पुन्हा एकदा १२०० कोटींचे कंत्राट पालिका काढत आहे. पण मुंबईकरांना चकाचक झालेले रस्ते मिळाणार का? – संदीप देशपांडे


लहान मुलांच्या लसीकरणाला DCGIकडून कोव्हॅक्सिन लसीला परवानगी देण्यात असून २ ते १८ वयोगटातील मुलांना ही लस देण्यात येणार आहे.


नाट्यगृह,थिएटर्स २२ ऑक्टोबरपासून सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. २२ ऑक्टोबरपासून खुले सांस्कृतिक कार्यक्रमही सुरू होणार आहे


दिल्लीत पाकिस्तानी दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे. अशरफ अली असे त्या दहशतवाद्याचे नाव आहे. दिल्लीच्या स्पेशल सेलने या दहशतवाद्याला अटक केली असून त्याच्याकडून एके ४७ आणि ग्रेनेड जप्त करण्यात आले आहे.


शरद पवारांच्या उपस्थितीत आज मुंबईत राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची बैठक पार पडणार आहे.


आजपासून पुण्यातील महाविद्यालये सुरू होणार आहेत. खरंतर काल म्हणजेच ११ ऑक्टोबर रोजी पुण्यातील महाविद्यालये सुरू होणार मात्र महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर आजपासून महाविद्यालये सुरू करण्यात येणार आहेत.