घरCORONA UPDATELive Update: मुंबईत २४ तासांत १,३५४ नवे रुग्ण आढळले, ३१ जणांचा मृत्यू!

Live Update: मुंबईत २४ तासांत १,३५४ नवे रुग्ण आढळले, ३१ जणांचा मृत्यू!

Subscribe

जाणून घ्या, दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

मुंबईत गेल्या २४ तासांत १ हजार ३५४ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ३१ जणांचा मृत्यूची नोंद झाली आहे. तसेच आज मुंबईत १ हजार ७१६ जणांचा रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा २ लाख ५४ हजार २४२वर पोहोचला आहे. यापैकी आतापर्यंत १० हजार १५३ मृत्यू झाला असून २ लाख २४ हजार २१७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. तसेच सध्या १८ हजार ९८४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

- Advertisement -

राज्यात गेल्या २४ तासांत ६ हजार ७३८ नव्या कोरोनाबाधित वाढ झाली असून ९१ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच ८ हजार ४३० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा १६ लाख ६० हजार ७६६वर पोहोचला आहे. यापैकी ४३ हजार ५५४ रुग्णांचा मृत्यू झाला असून १४ लाख ८६ हजार ९२६ रिकव्हर झाले आहेत. तसेच सध्या १ लाख २९ हजार ७४६ रुग्णांवर उपचार सुरू झाले आहेत. सविस्तर वाचा 

- Advertisement -

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर येत आहे. याबाबत त्यांनी स्वतः ट्विट करून माहिती दिली आहे. सविस्तर वाचा 

 


निवृत्ती महाराज इंदोरीकर वादग्रस्त वक्तव्य प्रकरणावरील आज होणारी सुनावणी टळली. या प्रकरणाची पुढील सुनावणी २५ नोव्हेंबरला होणार असल्याचे सांगितले जात आहे. तर ही सुनावणी दिवाणी न्यायालयाने दिलेल्या आदेशावर होणार होती. संगमनेर जिल्हा सत्र न्यायालयात हे प्रकरण सुरू असून दिवाणी न्यायालयाने कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले होते.


शरद पवारांचा केंद्र सरकारला सवाल

केंद्राने जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतून कांदा वगळला मग साठवणुकीच्या नावाने कारवाई का असा सवाल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकारला केला. कांद्यावर लादलेली निर्यातबंदी आणि साठवणुकीवरील मर्यादा या निर्णयांसंदर्भात लवकरच केंद्र सरकारशी चर्चा करण्यात येईल अशी ग्वाही देखील त्यांनी नाशिक जिल्ह्यातील शेतकर्‍यांना दिले. केंद्राच्या धोरणामुळे शेतकरी आणि व्यापार्‍यांना त्रास होत असला तरी कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद ठेवणे हा यावर पर्याय होऊ शकत नाही. त्यामुळे बाजार समित्या सुरु ठेवा असे आवाहनही त्यांनी केले. (सविस्तर वाचा)


नाशिकमध्ये शरद पवारांच्या उपस्थितीत बैठक सुरू आहे. या बैठकीत व्यापारी, कांदा उत्पादक शेतकरी, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, नाशिक कृषी उत्पन्न बाजार सभापती देविदास पिंगळे, पिंपळगाव बाजार समिती सभापती आमदार दिलीप बनकर, जिल्हाधिकारी सूरज मांढरे बैठकीला उपस्थित आहेत.


स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  दिल्लीहुन पुण्यात आल्यानंतर शेट्टी यांना अस्वस्थ वाटू लागले होते. रक्तदाब वाढला असल्याने त्यांना उपचारासाठी दाखल करून घेण्यात आले. राजू शेट्टी यांना गेल्या महिन्यात करोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्यांना ९ सप्टेंबर रोजी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. करोनावर मात केल्यानंतर आठवड्याभराने ते घरी परतले होते. त्यानंतर त्यांनी काही दिवस घरी विश्रांती घेतली होती.


१ नोव्हेंबरपर्यंत मंदिरं उघडा अन्यथा टाळं तोडू – आचार्य तुषार भोसले

आज आचार्य तुषार भोसले यांनी राज्यपालांची भेट घेतली आहे. यावेळी त्यांनी राज्य सरकारला इशारा दिला असून महाराष्ट्रातील मंदिरं खुली करण्यासाठी राज्यपालांना देखील साकडं घातलं आहे. ते म्हणाले संपूर्ण देशात मंदिरं उघडली महाराष्ट्रात का नाही? १ नोव्हेंबरपर्यंत मंदिरं उघडली नाही तर टाळं तोडू…


राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा देशाचे माजी कृषी मंत्री खासदार शरद पवार हे आज नाशिक दौऱ्यावर आहेत. ते आज भुजबळ नॉलेज सिटी नाशिक येथील एमबीए विभागातील कॉन्फरन्स हॉलमध्ये शेतकरी बांधव व व्यापारी बांधवाशी संवाद साधणार आहेत.


उपमुख्यमंत्री कोरोनामुक्त व्हावे म्हणून तुळजापुरात महाआरती

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाच्या प्रादुर्भावातून लवकरात लवकर बरे व्हावे व ते पुन्हा आपल्या कार्यात सक्रिय व्हावे यासाठी आज तुळजापुर येथे तुळजाभवानीच्या महाद्वारासमोर महाआरती करुन साकडे घातले. राष्ट्रवादी युवक प्रदेश व राष्ट्रवादी काँग्रेस तुळजापुर यांच्या वतीने महाआरती केलीे. तुळजाभवानीच्या आशीर्वादाने दादा लवकरात लवकर बरे होऊन ते लवकरच घरी येतील व पुन्हा जनतेच्या सेवेसाठी येतील.यासाठी प्रार्थना केली.


संजय राऊत यांचा भाजपला सवाल

जम्मू काश्मीरमधून कलम ३७० हटवून एक वर्षाचा कालावधी उलटून गेला आहे. मात्र तरीही या मुद्द्यावरून आजही राजकारण पेटलेले पाहायला मिळते. काश्मीरमध्ये कलम ३७० हटवल्यानंतरही श्रीनगरमध्ये काही तरुणांना तिरंगा फडकावण्यापासून मज्जाव करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी काश्मीर नेत्यांवर टीका केली आहे. तरुणांना श्रीनगरमध्ये तिरंगा फडकावू न देणे हा भारताच्या संविधानाचा सगळ्यात मोठा अपमान असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच भाजपा सरकारने जम्मू काश्मीरमधून कलम ३७० हटवून काय केले, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. (सविस्तर वाचा)


कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून गेल्या सात महिन्यांपासून बंद असणारी लोकल कोरोनादरम्यान फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी धावत होती. यानंतर लोकलमधून प्रवास करण्यासाठी महिला, वकील आणि खासगी सुरक्षा रक्षकांना परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान लवकरच मुंबईकरांसह सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळणार असल्याचे चिन्हे दिसताय. लोकलने सर्वसामान्य नागरिकांना प्रवासाची परवानगी मिळण्याची शक्यता असल्याचे मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. (सविस्तर वाचा)


देशात कोरोनाचा कहर कायम आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या मते, देशात एका दिवसात 43,893 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली तर 508 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोना बाधितांची संख्या आता 79,90,322 झाली आहे. यामध्ये 6,10,803 रुग्णांवर कोरोनाचे उपचार सुरू आहेत.


राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज नाशिक दौऱ्यावर

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ऊसतोडणीच्या दरावर तोडगा काढल्यानंतर आता नाशिककडे आपला मोर्चा वळवलाय. आज शरद पवार नाशिक दौरा करणार असून या दौऱ्यात ते कांदा उत्पादक आणि व्यापाऱ्यांची भेट घेणार आहेत. कांदा उत्पादक आणि व्यापाऱ्यांची भेट घेण्यासाठी शरद पवार हा दौरा करत आहे. शरद पवार त्यांच्यासोबत चर्चा करणार आहेत. कांदा व्यापारांनी अघोषित संप पुकारल्यामुळे तोडगा काढण्यासाठी शरद पवार मध्यस्थी करणार आहेत. त्याचबरोबर ते दिवंगत माजी मंत्री विनायकदादा पाटील यांच्या कुटुंबियांची सांत्वना भेट घेणार आहेत.

दरम्यान, केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या मर्यादेला कांदा व्यापाऱ्यांकडून विरोध केला जात आहे. गेल्या दोन दिवसांपासून कांदा लिलाव बंद आहे. कांदा साठवणीवर मर्यादा घातल्यामुळे व्यापाऱ्यांनी खरेदी बंद केली आहे. यावर आता शरद पवार तोडगा काढतात का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


परभणीचे शिवसेना खासदार संजय जाधव यांना जीवे मारण्यासाठी तब्बल दोन कोटी रुपयांची सुपारी दिल्याची तक्रार खासदार संजय जाधव यांनी परभणीच्या नानलपेठ पोलिस ठाण्यात दिली आहे त्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. खासदार संजय जाधव यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार नांदेड येथील रिंदा गॅंगला तब्बल दोन कोटी रुपये देऊन त्यांना संपवण्याचा कट रचण्यात आलाय यासाठी परभणीतील एका बड्या व्यक्तीने हे दोन कोटी रुपये देऊन त्यांची सुपारी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.


जम्मू-काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यात मंगळवारी रात्री उशीरा सुरक्षा दले आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाल्याची माहिती मिळतेय. जम्मू-काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यातील चादौरा भागातील मोचवाह येथे दहशतवादी असल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. त्यानंतर सुरक्षा दलाने घेराव घातला आणि शोध मोहीम सुरूच ठेवली. स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार सुरू केला त्यानंतर दोन्ही बाजूने चकमकीला सुरुवात झाली. (सविस्तर वाचा)


बिहार निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानास सुरूवात


नागपूरात २१९ दिवसांनी ‘आपली बस’ प्रवाशांच्या सेवेत

नागपूरात ३० टक्के क्षमतेने ‘आपली बस’ प्रवासी सेवेत येणार असल्याने नागपूर शहरातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. कोरोनामुळे तब्बल २१९ दिवस बंद होती बस सेवा होती. मात्र आजपासून पाच मार्गावर ४० बसेस सुरु होणार असल्याची माहिती मिळतेय. बुटीबोरी, खापरखेडा, हिंगणा मार्गावर सर्वाधिक बसेस धावणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -