Live Update: राज्यात आज १२,१३४ नव्या कोरोना रुग्णांचे निदान

live update
लाईव्ह अपडेट

राजस्थान रॉयल्सची आयपीएलच्या तेराव्या हंगामातील खराब कामगिरी सुरूच आहे. शारजावर झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने राजस्थान रॉयल्सला ४६ धावांनी पराभूत केलं. दिल्लीच्या १८५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थाननस सर्वबाद १३८ धावाच केल्या. नवख्या यशस्वी जयस्वालने एका बाजू धरून ठेवली मात्र त्याला इतर फलंदाजांची साथ मिळाली नाही. त्यामुळे राजस्थानच्या पदरी पुन्हा एकदा पराभव आला. (सविस्तर वाचा)


मुंबईत आज कोरोनाचे २ हजार २८७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आल्याने कोरोनाबाधितांची संख्या २ लाख २५ हजार ०४८ वर पोहचली आहे. तर ४७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा ९ हजार ३४० वर पोहचला आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे आज २ हजार ३४७ रूग्ण कोरोनावर मात करून बरे झाले आहेत तर आतापर्यंत एकूण १ लाख ८९ हजार ०२२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. (सविस्तर वाचा)


एटीएसचे नवे प्रमुख म्हणून आता जयजित सिंग हे राहणार असून देवन भारती सुरक्षा महामंडळात अप्पर महासंचालक म्हणून ते पदभार सांभाळणार आहेत.


गेल्या २४ तासांत राज्यात १२ हजार १३४ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ३०२ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या १५ लाख ०६ हजार ०१८ वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ३९ हजार ७३२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच दिलासादायक बाब म्हणजे आज १७,३२३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत (सविस्तर वाचा)


IAS अधिकारी सुधाकर शिंदे यांचे कोरोनामुळे निधन

देशासह राज्यात कोरोनाचा कहर सुरू असून राज्यात सध्या बाधितांचा आकडा वाढून १५ लाख ०६ हजार ०१८ वर पोहोचला आहे. राजकीय नेते मंडळीनंतर आता प्रशासकीय अधिकाऱ्याला देखील कोरोनाने आपल्या विळख्यात घेतले आहे. कोरोनामुळे महाराष्ट्रातील एका तरुण आयएएस अधिकाऱ्याचा मृत्यू झाला आहे. २०१५ बॅचचे परभणीचे आयएएस अधिकारी सुधाकर शिंदे यांचे कोविडमुळे निधन झाले आहे. सध्या ते त्रिपुरा राज्यात शिक्षण विभागात कार्यरत होते. (सविस्तर वाचा)


ठाण्यात हॉटेल्स, रेस्तराँट, फूड कोर्ट आणि बार रात्री ११.३० पर्यंत सुरु ठेवण्यात संमती देण्यात आली आहे. उद्यापासून म्हणजे १० ऑक्टोबरपासून सकाळी ७ ते रात्री ११.३० या वेळेत खुली ठेवण्यास संमती दिली आहे. हॉटस्पॉट क्षेत्राव्यतिरिक्त संपूर्ण शहरात राज्य ३० सप्टेंबर २०२० रोजी उपरोक्त संदर्भ ४ च्या आदेशान्वये जाहीर केल्याप्रमाणे मिशन बिगिन अगेन सुरु राहिल. तर हॉटेल्स, फूड कोर्ट, रेस्तराँ आणि बार सकाळी ७ ते रात्री ११.३० या वेळेत संमती देण्यात आली आहे. हॉटस्पॉट क्षेत्रांमध्ये ३१ ऑक्टोबरच्या रात्री १२ पर्यंत लॉकडाऊन सुरु राहिल असेही स्पष्ट करण्यात आले आहे.


राज्यातील येत्या ११ ऑक्टोबरला होणारी एमपीएसची परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. राज्य सरकारच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.


दिल्लीत दिवसभरात २ हजार ८६० नव्या रूग्णांची नोंद


पाकिस्तानच्या जिओ न्यूजच्या वृत्तानुसार, कंपनीच्या सूचनांचे पूर्णपणे पालन करण्यात अपयशी ठरल्यानंतर पाकिस्तानच्या टेलिकम्युनिकेशन ऑथोरिटीकडून चिनी अॅप टिकटॉकला ब्लॉक करण्यात आले आहे.


अभिनेत्री शिखा मल्होत्रा आढळली पॉझिटिव्ह

भारतात कोरोनाची स्थिती गंभीर होत असल्याने पाहून कोरोना वॉरिअर बनलेली अभिनेत्री शिखा मल्होत्रा स्वतःच कोरोनाबाधित झाली आहे. शिखा मल्होत्रा कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली असून ही माहिती तिने सोश मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. शिखाने काही महिन्यांपूर्वी मुंबई महानगरपालिकेच्या स्व. बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर हॉस्पिटलमध्ये नर्सचे काम करण्यास सुरूवात केली होती. मात्र कोरोनाबाधितांची सेवा करताना शिखालाच कोरोनाची बाधा झाली आहे. (सविस्तर वाचा)


केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या अंत्यदर्शनासाठी केंद्रीय मंत्री पियुष गोयल दिल्लीच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत.


केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या निधनानंतर केंद्र मंत्री पियुष गोयल यांना ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे.


केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या अंत्यदर्शनासाठी काँग्रेसच्या माजी अध्यक्ष राहुल गांधी दिल्लीच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत.


मुंबईच्या लोकलच्या फेऱ्या वाढवण्यासाठी किंवा सर्वांना प्रवासाची मुभा देण्यास आमची हरकत नाही, राज्य सरकारने अशी हायकोर्टात माहिती दिली आहे. पण अजूनही लोक सार्वजनिक ठिकाणी मास्क लावत नाही, म्हणून त्यांच्यावर ऑक्सिजन मास्क लावण्याची वेळ येतेय, असे महाधिवक्त्याची सांगितली आहे. यासंदर्भात मुंबई हायकोर्टात याचिक दाखल केल्या आहेत.


देशात काल दिवसभरात ११ लाख ६८ हजार ७०५ नमुन्यांची चाचण्या झाल्या आहेत. त्यामुळे आतापर्यंत देशात ८ कोटी ४६ लाख ३४ हजार ६८० कोरोनाच्या चाचण्या झाल्याची माहिती आयसीएमआरने दिली आहे.


केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या अंत्यदर्शनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत.


देशात गेल्या २४ तासांत ७० हजार ४९६ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ९६४ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांचा आकडा ६९ लाख ६ हजार १५२वर पोहोचला आहे. यापैकी आतापर्यंत १ लाख ६ हजार ४९० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच ५९ लाख ६ हजार ७० रुग्ण कोरोनामुक्त झाले असून ८ लाख ९३ हजार ५९२ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.


जगातील कोरोनाबाधितांचा आकडा सातत्याने वाढत आहे. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार, जगभरात आतापर्यंत ३ कोटी ६७ लाखांहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहे. त्यापैकी १ लाख ६६ हजारांहून अधिक जण मृत्यूमुखी पडले आहेत. तसेच २ कोटी ७६ लाखांहून अधिक जण कोरोनामुक्त झाले आहेत.


राज्यात १३,३९५ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, कोरोना बाधित रुग्णांची संख्या १४,९३,८८४ झाली आहे. राज्यात २,४१,९८६ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात ३५८ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, मृतांची संख्या ३९,४३० वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.६४ टक्के एवढा आहे. सविस्तर वाचा