घरताज्या घडामोडीLive Update : नाशिक पोलीस आयुक्त पदी दीपक पांडे यांची बदली  

Live Update : नाशिक पोलीस आयुक्त पदी दीपक पांडे यांची बदली  

Subscribe

नाशिक पोलीस आयुक्त पदी दीपक पांडे यांची बदली


रवी राणा २२ एप्रिलला मुंबईत येणार, मातोश्रीवर हनुमान चालीसा करणार पठण

- Advertisement -

औरंगाबादमध्ये १ मे रोजी राज ठाकरेंची जाहीर सभा


वकील गुणरत्न सदावर्ते यांची न्यायालयीन कोठडी गिरगाव कोर्टाकडून कायम

- Advertisement -

जवळपास ४८ हजार कर्मचाऱ्यांकडून प्रत्येकी २०० ते ३०० रुपये घेतले.

स्वत:ची बाजू मांडताना गुणरत्न सदावर्तेंची कोर्टात माहिती

कर्मचाऱ्यांकडून गोळा केलेल्या पैशातून मालमत्ता खरेदीचा पोलिसांना संशय

सदावर्तेंचा ताबा घेण्यासाठी कोल्हापूर पोलिसांचा न्यायालयात अर्ज


भाजप नेते अनिल बोंडेंविरोधात गुन्हा दाखल

यशोमती ठाकूर अचलपूर घटनेच्या मास्टरमाईंड असल्याचा आरोप अनिल बोंडे यांनी केला होता. जातीय तेढ निर्माण केल्याच्या आरोपाखाली अनिल बोंडेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


नील सोमय्या यांना अटकपूर्व जामीन मंजूर

विक्रांत घोटाळ्याप्रकरणी किरीट सोमय्या यांच्यानंतर कोर्टाने त्यांचे पुत्र नील सोमय्या यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला


दिल्लीतील जहांगीरपुरी भागात झालेल्या हिंसाचाराच्या तीन दिवसांनंतर अवैध बांधकामांवरील तोडक कारवाईला सुरुवात झाली आहे. दिल्ली महानगरपालिकेने (MCD) बुल्डोझरने अतिक्रमण हटवण्यास सुरुवात केली. ही कारवाई थांबवा असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.


विक्रांत घोटाळ्याप्रकरणी किरीट सोमय्या यांची सलग तिसऱ्या दिवसी चौकशी

संजय राऊत यांनी केले होते आरोप,

माजी सैनिकाच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल


राज्यभरात लालपरी हळूहळू पूर्वपदावर, ७० हजार संपकरी एसटी कर्मचारी कामावर रुजू

२२ एप्रिलपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांना कामावर हजर होण्याचे आदेश हायकोर्टाने दिले होते. हायकोर्टाच्या आदेशानंतर २६ हजार कर्मचारी नव्याने कामावर हजर झालेत. यात सुमारे २४ हजार ड्रायव्हर तर १९ हजार ५०० कंडक्टरांचा समावेश आहे. आत्तापर्यंत एकूण ७० हजार संपकरी एसटी कर्मचारी कामावर रुजू झालेत. मंगळवारी एका दिवसात ७ हजार ४३५ कर्मचारी कामावर हजर झालेत.


वीज वितरण यंत्रणेच्या नियोजित देखभाल-दुरुस्तीसाठी डोंबिवली व कल्याण पूर्व भागातील काही भागाचा वीजपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. संबंधित भागातील वीज ग्राहकांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे.

डोंबिवलीतील रामनगर फिडरवरील रामनगर पोलिस ठाणे, केळकर रोड, राजाजी रोड, क्रांती नगर, मद्रासी मंदिर, म्हात्रे नगर, नवीन आयरे रोड, आयरे गाव या भागात बुधवारी (२० एप्रिल) सकाळी १० ते दुपारी ४ पर्यंत वीजपुरवठा बंद असेल. दत्तनगर फिडरवरील स्वामी शाळा, कॉमर्स प्लाझा, टिपटॉप कॉर्नर, जूना आयरे रोड, फाटकवाडी, दत्तनगर, संगितावाडी, दत्त चौक, शिवमंदिर रोड, डीएनसी कॉलेज, नांदिवली रोड, व तुकाराम नगर फिडरवरील आयरे रोड, तुकाराम नगर, सुदामवाडी, आयरे नगर, पाटकर शाळा या भागात गुरुवारी (२१ एप्रिल) सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत वीजपुरवठा बंद राहणार आहे.


संजय राऊत यांच्याविरोधात इंडियन बार असोसिएशनची हायकोर्टात अवमान याचिका दाखल केली आहे.

किरीट सोमय्या आणि भाजप नेत्यांना कोर्टातून झुकतं माप दिलं जात असल्याचा आरोप करणं चुकीचं, याचिकेत दावा

लवकरच याचिकेवर सुनावणीची शक्यता

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -