घरपालघरघरकुलांची ई-मस्टर मजुरी गेली कुठे?; कुंर्झे येथील लाभार्थी मजुरीच्या प्रतिक्षेत

घरकुलांची ई-मस्टर मजुरी गेली कुठे?; कुंर्झे येथील लाभार्थी मजुरीच्या प्रतिक्षेत

Subscribe

कुंर्झे ग्रामपंचायतीधील ४२ घरकुल लाभार्थ्यांना म.गा.रा.ग्रा.रोहयो अंतर्गत ई-मस्टर मजुरी अदा न करताच, लाभार्थ्यांचे घरकुल खाते पंचायत समितीकडून बंद केल्याची धक्कादायक माहिती निदर्शनास आली आहे.

कुंर्झे ग्रामपंचायतीधील ४२ घरकुल लाभार्थ्यांना म.गा.रा.ग्रा.रोहयो अंतर्गत ई-मस्टर मजुरी अदा न करताच, लाभार्थ्यांचे घरकुल खाते पंचायत समितीकडून बंद केल्याची धक्कादायक माहिती निदर्शनास आली आहे. कुंर्झे ग्रामपंचायतीमधील २०१५-१६ ते २०१७-१८ पर्यंत इंदिरा आवास योजना, प्रधानमंत्री आवास योजना, शबरी आवास योजनेअंतर्गत जवळपास १४२ घरकुले मिळाली होती. या लाभार्थ्यांपैकी १०० घरकुलीची पूर्ण रक्कम अदा करण्यात आली आहे. तर ४२ घरकुल लाभार्थ्यांना रोहयो अंतर्गत ई-मस्टर मजुरी रक्कम अजूनही देण्यात आलेली नसताना या लाभार्थ्यांची घरकुल खाते पूर्ण बंद केल्याची माहिती पंचायत समितीकडून लाभार्थ्यांना मिळाली आहे.

आम्हाला २०१५-१६ मध्ये घरकुल मंजूर झाले. ते आम्ही २०१७ मध्ये बांधून पूर्ण केले असून इतर घरकुल हप्ते रक्कम मिळाली. मात्र ई-मस्टर मजुरी रक्कम अजूनही मिळालेली नाही.
– नीता पवार, घरकुल लाभार्थी, कुंर्झे

- Advertisement -

घरकुलांचे ई-मस्टर मजुरी न मिळाल्याने कुंर्झे- गिंभलपाडा येथील लाभार्थी नीता विजय पवार यांनी २६ फेब्रुवारी २०२१ रोजी गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती. या संदर्भात २ मार्च २०२१ ला गटविकास अधिकारी यांनी कुंर्झे ग्रामपंचायतीकडे अहवाल मागविली होता. मात्र अजूनही या लाभार्थ्यांना ई-मस्टर मजुरी मिळाली नाही. लाभार्थ्यांनी याची वारंवार विचारणा केली, तरीही कुठलीही भूमिका पंचायत समितीकडून घेतलेली दिसत नाही. उलट लाभार्थ्यांचे घरकुल खाते बंद केल्याची माहिती देण्यात आली. यावर ई-मस्टर मजुरी अदा न करता घरकुल खाते बंद कसे केले?, असा प्रश्न उपस्थित होत आहे. लाभार्थी संतप्त झाले असून घरकुल लाभार्थ्यांना शासनाने फसवले आहे. संबंधित अधिकाऱ्यांवर न्यायालयात जावे लागेल, अशीही चर्चा रंगू लागली आहे.

हेही वाचा –

‘पुन्हा चला नाहीतर पुढे चला’ हाच आपला मंत्र, आदित्य ठाकरेंचा भाजपला टोला

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -