कर्ज न दिल्याच्या रागात तरुणाने चक्क बँकेलाच लावली आग, झाली तुरुंगात रवानगी

आरोपीला पोलिसांनी अटक केली असून त्याच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 436, 477 आणि 435 अंतर्गत कागिनेली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Karnataka Man Sets Bank On Fire After His Loan Application Was Rejected
लोन न दिल्याच्या रागातन तरुणाने चक्क बँकेलाच लावली आग, तुरुंगात झाली रवानगी

छोट्या – छोट्या गोष्टींवर राग व्यक्त करणं हे अनेकदा मोठ्या नुकसानाचे कारण ठरु शकते, याचा प्रत्यय नुकताच एका घटनेतून समोर आलाय. बँकेने कर्ज मंजूर न केल्याच्या रागात कर्नाटकातील एका व्यक्तीने टोकाचे पाऊल उचलले आहे. मात्र यामुळे तरुणाला तुरुंगाची हवा खावी लागली आहे. पोलिसांनी या तरुणाविरोधात अनेक गंभीर कलमांअंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु केला आहे.

कर्नाटकातील हावेरी जिल्ह्यात ही घटना घडली आहे. एका व्यक्तीने रागाच्या भरात रविवारी बँकेला आग लावली. कर्ज देण्यास नकार दिल्याने आरोपी तरुणाने हा भयंकर प्रकार केल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर आरोपीला पोलिसांनी अटक केली असून त्याच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 436, 477 आणि 435 अंतर्गत कागिनेली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तरुणाला कर्जाची गरज होती, यासाठी त्याने बँकेशी संपर्क कर्जासाठी अर्ज केला. मात्र, बँकेने कागदपत्रांची पडताळणी करत त्याचा कर्जाचा अर्ज फेटाळून लावला. यावेळी रागाच्या भरात थेट बँकेला आग लावली. या घटनेनंतर बँकेच्या सुरक्षा रक्षकांना आणि आजूबाजूच्या लोकांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी पोलीस आता आरोपीची चौकशी करत आहेत.


Heart Transplant from Pig : ऐतिहासिक! डुकराच्या ह्रदयावर आता जगणार माणूस, अमेरिकेत यशस्वी शस्त्रक्रिया