घरCORONA UPDATECoronaVirus : लॉकडाऊन ४० देशांनी उठवला!

CoronaVirus : लॉकडाऊन ४० देशांनी उठवला!

Subscribe

बहुतांश देशांनी सार्वजनिक ठिकाणांवर फिजिकल डिस्टन्सिंगची प्रमुख अट अनिवार्य करून लॉकडाऊनमध्ये सवलत दिली आहे.

जगात ८० देशांनी कोरोनामुळे लॉकडाऊन लावला होता. त्यापैकी ४० देशांनी लॉकडाऊन उठवला आहे. ऑरा व्हिजनसह इतर अनेक संशोधन संस्थांच्या एका अहवालातून हा दावा करण्यात आला आहे. लॉकडाऊन उठणाऱ्या देशांत पुन्हा उद्योग, दुकाने, किनारपट्टी व इतर स्थळांचा समावेश आहे. बहुतांश देशांनी सार्वजनिक ठिकाणांवर फिजिकल डिस्टन्सिंगची प्रमुख अट अनिवार्य करून लॉकडाऊनमध्ये सवलत दिली आहे. लॉकडाऊनमध्ये शिथिलता देणारे सर्वाधिक २९ देश युरोपातील आहेत. कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव असलेल्या टॉप-१० देशांपैकी ६ युरोपातील आहेत.

लॉकडाऊन उठविणाऱ्या देशांतील सरकारच्या म्हणण्यानुसार अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्यासाठी लॉकडाऊन उठविणे अत्यंत गरजेचे होते. बहुतांश देश लॉक डाऊन उठवल्यापासून सीमा सुरू करण्यावर जास्त भर देत आहे. काही देशांनी तर तारखांची देखील घोषणा केली आहे. काही त्यावर विचार करत आहेत. यात बेल्जियन, जर्मनी, स्वित्झर्लंड १५ जूनपासून पर्यटकांना प्रवेश देण्यासाठी योजना तयार करत आहेत. याबाबतची अधिकृत घोषणा या महिन्याच्या अखेरीस होऊ शकते. ग्रीस १ जुलैपासून परदेशी पर्यटकांसाठी सीमा खुली करणार आहे. इटली तीन जून पासून सीमा सुरू करणार आहे. नेदरलँडने काही देशांतील यात्रेकरूंना येण्याची परवानगी दिली आहे. पोलंड १३ जून पासून सीमा खुली करणार आहे. जगातील २१३ देश व स्वायत्त क्षेत्रावर कोरोनाचा प्रादुर्भाव दिसतो. येथे आतापर्यंत ४,९१७,४१७ रुग्ण समोर आले आहेत.

- Advertisement -

युरोप – १० देशात शाळा, सलून आणि सिनेमागृह खुले

फ्रान्स – लोकांना भटकण्याची घराबाहेर पडण्याची परवानगी दिली. प्राथमिक शाळा, सलून सुरू. रेस्तराँ व बार २ जूननंतर सुरू होणार. पॅरिसहून लंडनला जाणारी काही विमान उड्डाणे सुरू.

स्पेन – राजधानी माद्रिद व बार्सिलोना वगळता इतर भागात लॉकडाऊन सुरू. बार, रेस्तराँ सुरू. मित्र-नातेवाईकांचा प्रत्येकी १० लोकांचा गट एकत्र येण्याची परवानगी. पार्टीसाठी परवानगी नाही.

- Advertisement -

ब्रिटन – सरकारने लोकांना कामावर परत येण्याचे आवाहन केले. खासगी किंवा कार्यालयीन वाहनाने प्रवासाचाही सल्ला दिला. रेल्वेत फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करण्यास सांगितले आहे.

बेल्जियम – दुकाने, संग्रहालये खुले. ८ जूनपासून कॅफे, रेस्तराँ, काही पर्यटन स्थळे सुरू राहतील.

डेन्मार्क – दुकाने, उद्यान, रेस्तराँ व काही हॉटेल खुले. सार्वजनिक परिवहन सुविधा सुरू. क्रीडा, सिनेमागृह ८ जून नंतर खुले होणार.

फिनलँड – ब्रिटनला जाण्यासाठी उड्डाणे सुरू. दुकाने सुरु झाली. रेस्तराँ, बार व सांस्कृतिक संस्था १ जूनपासून सुरू होतील. ऑगस्ट पासून ५० जणांच्या समूहासह कार्यक्रमाची परवानगी दिली.

जर्मनी – काही घरगुती विमान उड्डाणे सुरू. दुकाने, रेस्तराँ खुले, हॉटेल २५ मे पासून सुरू होतील. मोठे कार्यक्रम ऑगस्टपासून आयोजित करण्यास परवानगी. १६ राज्यांनी लॉक डाऊन उठविण्याचा निर्णय घेतला.

ग्रीस – काही अंतर्गत व आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू. १ जून पासून थेट ब्रिटनसाठी उड्डाण सेवा सुरू होईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -