३१ मे नंतर लॉकडाऊन ५? ‘या’ ११ शहरांमध्ये सूट नाही!

लॉकडाऊन ३१ मे नंतर वाढणार असल्याची शक्यता दिसून येत आहे.

All establishments in Sangamnera closed till May 26
लॉकडाऊन वाढवला

कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, याकरता देशात चौथ्यांदा लॉकडाऊन करण्यात आला. मात्र, आता हा चौथा टप्पा संपत आला असून पुन्हा लॉकडाऊन वाढणार का याबाबत अनेकांच्या मनात प्रश्न आहे. लॉकडाऊन ४ हा येत्या ३१ मे रोजी संपणार आहे. त्यामुळे १ जूनपासून पुन्हा लॉकडाऊन वाढण्याची शक्यता आहे. कारण देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या सतत वाढत आहे. त्यामुळे लॉकडाऊन हटवण्याचा निर्णय हा घातक ठरु शकतो. हे देखील अनेकांना माहित आहे. अशा परिस्थितीत आज तकच्या वृत्तानुसार, १ जूनपासून देशात लॉकडाऊन ५ लागू होईल, अशी शक्यता आहे. मात्र, यामध्ये काही नियम शिथील करण्यात आले तरी देखील ११ शहरांमध्ये अजिबात सूट दिली जाणार नाही.

ही आहेत ११ शहर

मुंबई, बेंगरुळ, पुणे, दिल्ली, ठाणे, इंदोर, चेन्नई, अहमदाबाद, जयपुर, सूरत आणि कोलकत्ता या शहरांमध्ये अजिबात सूट दिली जाणार नाही. कारण या शहरांमध्ये ७० टक्के कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.

सूत्रांच्या माहितीनुसार, जर लॉकडाऊन ५ लागू करण्यात आला तर खालील गोष्टींमध्ये दिलासा मिळू शकतो.

  • धार्मिकस्थळे उघडले जाऊ शकतात. परंतु कोणताही उत्सव साजरा करण्यास परवानगी दिली जाणार नाही, जेणेकरुन गर्दी जमणार नाही.
  • या व्यतिरिक्त मास्क, सामाजिक अंतर आवश्यक असणार आहे. कर्नाटक सरकारने १ जूनपासून धार्मिक स्थळ उघडण्यास परवानगी मागितली होती.
  • जीम आणि सलून उघडण्याची परवानगी झोननुसार दिली जाऊ शकते.
  • लॉकडाऊन ५ मध्येही शाळा, महाविद्यालये, सिनेमा हॉल, मॉल्स बंद राहतील.
  • या व्यतिरिक्त, विवाह आणि अंत्यसंस्कारात ही मर्यादित लोकांना सहभागी होता येईल.

हेही वाचा – नाशकात ५३ नवे रुग्ण पॉझिटिव्ह