घरदेश-विदेशअखेर घोषणा झाली! ७ टप्प्यांमध्ये मतदान, निकाल २३ मे रोजी

अखेर घोषणा झाली! ७ टप्प्यांमध्ये मतदान, निकाल २३ मे रोजी

Subscribe

केंद्रीय निवडणूक आयोगाने अखेर लोकसभा निवडणुकांसाठीच्या मतदानाच्या तारखा जाहीर केल्या आहेत. दिल्लीतील विज्ञान भवनामध्ये निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली.

गेल्या कित्येक दिवसांपासून ज्या एका मुद्द्यावर राज्यातलं आणि देशभरातलं राजकारण फिरत होतं, ती घोषणा अखेर निवडणूक आयोगाने केली आहे. देशभरात होणाऱ्या लोकसभा निवडणुकांसाठीच्या मतदानाच्या तारखा अखेर आयोगाने जाहीर केल्या आहेत. त्यानुसार देशात ११ एप्रिलपासून १९ मे पर्यंत लोकसभेसाठी मतदान होणार आहे. त्यामध्ये महाराष्ट्रात एकूण चार टप्प्यांमध्ये मतदान होणार असून पहिल्या टप्प्याचं मतदान ११ एप्रिलला, दुसऱ्या टप्प्याचं मतदान १८ एप्रिलला, तिसऱ्या टप्प्याचं मतदान २३ एप्रिलला तर चौथ्या टप्प्याचं मतदान २९ एप्रिलला होणार आहे. २३ मे रोजी संपूर्ण देशभरात मतमोजणी होऊन २०१९मध्ये कोण पंतप्रधानपदाची शपथ घेणार? यावर शिक्कामोर्तब होणार आहे. सर्वच पक्षा आपापल्या परीने तयारीला लागले असून आघाड्या आणि युत्यांची चर्चाही जवळपास अंतिम टप्प्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या तारखांनंतर आचारसंहिता लागू झाल्यामुळे लोकसभा निवडणूक २०१९ची खऱ्या अर्थाने रणधुमाळी सुरू झाली आहे.

पहिला टप्पा –  २० राज्य – ९१ मतदारसंघ

नोटिफिकेशन – ८ मार्च
अर्जाची शेवटची तारीख – २५ मार्च
अर्जांची छाननी – २६ मार्च
अर्ज मागे घेण्याची तारीख – २६ मार्च
मतदान – ११ एप्रिल
मतमोजणी – २३ मे
निवडणूक पूर्ण होण्याचा काळ – २७ मे

- Advertisement -

दुसरा टप्पा – १३ राज्य – ९७ मतदारसंघ

नोटिफिकेशन – १९ मार्च
अर्जाची शेवटची तारीख – २६ मार्च
अर्जांची छाननी – २७ मार्च
अर्ज मागे घेण्याची तारीख – २९ मार्च
मतदान – १८ एप्रिल
मतमोजणी – २३ मे
निवडणूक पूर्ण होण्याचा काळ – २७ मे

तिसरा टप्पा – २० राज्य – ९१ मतदारसंघ

नोटिफिकेशन – २८ मार्च
अर्जाची शेवटची तारीख – ४ एप्रिल
अर्जांची छाननी – ५ एप्रिल
अर्ज मागे घेण्याची तारीख – ८ एप्रिल
मतदान – २३ एप्रिल
मतमोजणी – २३ मे
निवडणूक पूर्ण होण्याचा काळ – २७ मे

- Advertisement -

चौथा टप्पा – ९ राज्य – ७१ मतदारसंघ

नोटिफिकेशन – २ एप्रिल
अर्जाची शेवटची तारीख – ४ एप्रिल
अर्जांची छाननी – ५ एप्रिल
अर्ज मागे घेण्याची तारीख – ८ एप्रिल
मतदान – २९ एप्रिल
मतमोजणी – २३ मे
निवडणूक पूर्ण होण्याचा काळ – २७ मे

पाचवा टप्पा – ७ राज्य – ५१ मतदारसंघ

नोटिफिकेशन – १० एप्रिल
मतदान – ६ मे
मतमोजणी – २३ मे
निवडणूक पूर्ण होण्याचा काळ – २७ मे

सहावा टप्पा – ७ राज्य – ५९ मतदारसंघ

नोटिफिकेशन – १६ एप्रिल
मतदान – १२ मे
मतमोजणी – २३ मे
निवडणूक पूर्ण होण्याचा काळ – २७ मे

सातवा टप्पा – ८ राज्य – ५९ मतदारसंघ

नोटिफिकेशन – २२ एप्रिल
मतदान – १९ मे
मतमोजणी – २३ मे
निवडणूक पूर्ण होण्याचा काळ – २७ मे

कितव्या टप्प्यात कोणत्या राज्यात मतदान?

एका टप्प्यात होणाऱ्या निवडणुका – आन्ध्र प्रदेश, अरूणाचल, गोवा, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, केरळ, मेघालय, मिझोराम, नागालँड, पंजाब, सिक्कीम, तेलंगाणा, तमिळनाडू, उत्तराखंड, अंदमान निकोबार, दादर नगर हवेली, दमण दीव, दिल्ली, पाँडिचेरी, चंदीगड

दोन टप्प्यांमध्ये होणाऱ्या निवडणुका – कर्नाटक, मणिपूर, राजस्थान, त्रिपुरा

तीन टप्प्यांमध्ये होणाऱ्या निवडणुका – आसाम, छत्तीसगड

चार टप्प्यांमध्ये होणाऱ्या निवडणुका – झारखंड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा

पाच टप्प्यांमध्ये होणाऱ्या निवडणुका – जम्मू-कश्मीर

सहा टप्प्यांमध्ये होणाऱ्या निवडणुका – कोणतंही राज्य नाही

सात टप्प्यांमध्ये होणाऱ्या निवडणुका – बिहार, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल

कुठल्या टप्प्यात किती जागांसाठी मतदान?

पहिला टप्पा मतदान

आंध्र – सर्व २५ जागा
अरुणाचल – २ जागा
आसाम – ५ जागा
बिहार – ४ जागा
छत्तीसगड – १ जागा
जम्मू-काश्मीर – २ जागा
महाराष्ट्र – ७ जागा
मणिपूर – १ जागा
मेघालय – २ जागा
मिझोराम – १ जागा
नागालँड – १ जागा
ओडिशा – ४ जागा
सिक्कीम – १ जागा
तेलंगाणा – १७ जागा
त्रिपुरा – १ जागा
उ. प्रदेश – ८ जागा
उत्तराखंड – ५ जागा
प. बंगाल – २ जागा
अंदमान – १ जागा
लक्षद्वीप – १ जागा

दुसरा टप्पा मतदान

आसाम – ५ जागा
बिहार – ५ जागा
छत्तीसगड – ३ जागा
जम्मू – २ जागा
कर्नाटक – १४ जागा
महाराष्ट्र – १० जागा
मणिपूर – १ जागा
ओडिशा – ५ जागा
तमिळनाडू – ३९ जागा
त्रिपुरा – १ जागा
उ. प्रदेश – ८ जागा
प. बंगाल – ३ जागा
पाँडिचेरी – १ जागा

तिसरा टप्पा मतदान

आसाम – ४ जागा
बिहार – ५ जागा
छत्तीसगड – ७ जागा
गुजरात – २६ जागा
गोवा – २ जागा
जम्मू – १ जागा
कर्नाटक – १४ जागा
केरळ – २० जागा
महाराष्ट्र – १४ जागा
ओडिशा – ६ जागा
उत्तर प्रदेश – १० जागा
प. बंगाल – ५ जागा
दादर-नगर हवेली – १ जागा
दमण-दीव – १ जागा

चौथा टप्पा मतदान

बिहार – ५ जागा
जम्मू – १ जागा
झारखंड – ३ जागा
मध्य प्रदेश – ६ जागा
महाराष्ट्र – १७ जागा
ओडिशा – ६ जागा
राजस्थान – १३ जागा
उत्तर प्रदेश – १३ जागा
पश्चिम बंगाल – ८ जागा

पाचवा टप्पा मतदान

बिहार – ५ जागा
जम्मू – २ जागा
झारखंड – ४ जागा
म. प्रदेश – ७ जागा
राजस्थान – १२ जागा
उ. प्रदेश – १४ जागा
प. बंगाल – ७ जागा

सहावा टप्पा मतदान

बिहार – ८ जागा
हरियाणा – १० जागा
झारखंड – ४ जागा
मध्य प्रदेश – ८ जागा
उत्तर प्रदेश – १४ जागा
प. बंगाल – ८ जागा
दिल्ली – ७ जागा

सातवा टप्पा मतदान

बिहार – ८ जागा
झारखंड – ३ जागा
मध्य प्रदेश – ८ जागा
पंजाब – १३ जागा
प. बंगाल – ९ जागा
चंदीगड – १ जागा
उत्तर प्रदेश – १३ जागा
हिमाचल प्रदेश – ४ जागा

कशी असेल निवडणूक काळातली नियमावली?

राजधानी दिल्लीतील विज्ञान भवनामध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन निवडणुकांच्या तारखांसंदर्भात घोषणा केली. देशात वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. त्यानुसार उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तामिळनाडू, आंध्र प्रदेश अशा मोठ्या राज्यांमध्ये एकाहून अधिक टप्प्यांमध्ये मतदान होणार असून इतर प्रशासकीय दृष्ट्या लहान राज्यांमध्ये एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. देशात यंदा ९० कोटी मतदार असून २०१४च्या तुलनेत त्यात ७ कोटींची भर पडल्याचं यावेळी जाहीर करण्यात आलं. यंदा १० लाख मतदान केंद्र असणार आहेत. सर्व मतदान केंद्रांवर इव्हीएम वापरणार असल्याचं देखील जाहीर करण्यात आलं आहे. त्या त्या ठिकाणी मतदान यंत्र पोहोचली आहेत. मतदारांसाठी १५९० हा टोल फ्री क्रमांक तक्रारीसाठी असेल. यंदा १८ ते १९ वयोगटातील मतदारांची संख्या दीड कोटी असेल. या निवडणुकीत ७१ हजार परदेशातील भारतीय नागरिक मतदान करणार. यंदा इव्हीएम मशीनवर उमेदवाराचा फोटो देखील असणार. त्याशिवाय विरोधकांनी केलेली व्हीव्हीपॅटची मागणी मान्य करण्यात आली असून आपण कुणाला मतदान केलं आहे याचा पुरवा मतदारांना आता मिळणार आहे. स्थानिक पातळीवर गैरप्रकार झाल्याची तक्रार जर कुणी केली, तर त्यासंदर्भात करण्यात आलेल्या कारवाईची बातमी स्थानिक माध्यमांमध्ये देण्यात येईल. जेणेकरून संबंधित प्रकरणात काय कारवाई केली आहे, त्याची माहिती सदर तक्रारकर्त्याला मिळू शकेल. अशी तक्रार करणाऱ्या तक्रारदारांची नावं त्यांची इच्छा असेल तर गुप्त ठेवण्यात येतील. जर उमेदवारांनी आचारसंहितेचं उल्लंघन केलं, तर अशा उमेदवारांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत उमेदवारांना प्रचाराचे लाऊड स्पीकर लावता येणार नाहीत. त्याशिवाय मतदानाच्या ४८ तास आधी लाऊडस्पीकर लावता येणार नाहीत. तसेच उमेदवारांना फॉर्म २६ भरावा लागणार आहे. सोशल मीडियासाठीही आचारसंहिता लागू असेल. गुगल आणि फेसबुकने देखील अशा राजकीय जाहिरातबाजीवर लक्ष ठेवण्याचं आश्वासन दिलं आहे.

 

२०१४मधील पक्षांची कामगिरी

भाजप – ४२८ उमेदवार – २८२ विजयी

काँग्रेस – ४६४ उमेदवार – ४४ विजयी

राष्ट्रवादी काँग्रेस – ३६ उमेदवार – ६ विजयी

बसपा – ५०३ उमेदवार – ० विजयी

भाकप – ६७ उमेदवार – १ विजयी

माकप – ९३ उमेदवार – ९ विजयी

शिवसेना – २० उमेदवार – १८ विजयी

सपा – ७८ उमेदवार – ५ विजयी

अद्रमुक – ४० उमेदवार – ३७ विजयी

द्रमुक – ३५ उमेदवार – ० विजयी

जदयु – ३८ उमेदवार – २ विजयी

जदसे – २६ उमेदवार – २ विजयी

बीजेडी – २१ उमेदवार – २० विजयी

एलजेपी – ७ उमेदवार – ६ विजयी

मनसे – १० उमेदवार – ० विजयी

राजद – २८ उमेदवार – ४ विजयी

शिरोमणी अकाली दल – १० उमेदवार – ४ विजयी

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -