धक्कादायक! प्रेयसीसोबत लग्न करण्यासाठी मुलांने कुटुंबाला दिले विष

एका तरुणाने प्रेयसीसोबत लग्न करण्यासाठी आपल्या कुटुंबाला संपवण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

love affair greed made albin poison his parents little sister in Kerala
प्रेयसीसोबत लग्न करण्यासाठी मुलांने कुटुंबाला दिले विष

प्रेमासाठी वाटेल ते करण्याची बऱ्याच जणांची तयारी असते. मग प्रेमाकरता एखादी व्यक्ती कोणत्याही थराला जाते. असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका तरुणाने प्रेयसीसोबत लग्न करण्यासाठी आपल्या कुटुंबाला संपवण्याचा प्रयत्न केला आहे. कोझीकोडच्या कासारगोडच्या वेल्लारीकुंडूमध्ये ही घटना घडल्याचे समोर आले आहे. अल्बिन बेनी असे या तरुणाचे नाव आहे. या तरुणाने प्रेयसीशी लग्न करण्यासाठी आणि कुटुंबियांची मालमत्ता मिळवण्यासाठी हा गुन्हा केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे.

नेमके काय घडले?

वेल्लारीकुंडू येथे राहणाऱ्या अल्बिन बेनी या तरुणांने प्रेयसीसोबत लग्न करण्यासाठी आणि कुटुंबाची चार एकरची मालमत्ता स्वत:च्या नावे करुन घेण्यासाठी हे कृत्य केल्याचे समोर आले आहे. या तरुणाने कुटुंबियांना मारण्यासाठी आईस्क्रीम मधून उंदीर मारण्याचे विष मिसळले होते. हे विष मिसळलेले आईस्क्रीम त्यांनी त्याच्या वडिलांना, आईला आणि बहिणीला दिले. पण, आईची तब्येत बरी नसल्यामुळे आईने थोडेच आईस्क्रीम खाल्ले. त्यामुळे आईची प्रकृती बिघडलेली नाही. मात्र, बहिणीने आईस्क्रीम खाल्ल्यामुळे तिचा मृत्यू झाला आहे. तर वडिलांची प्रकृती चिंताजनक आहे.

मिळालेल्या माहितीनुसार; आईला काहीही झाले नसल्याने आईवर संशय व्यक्त केला जात होता. मात्र, बेनीच्या आईने तब्येत बरी नसल्यामुळे थोडेच आईस्क्रीम खाल्ले आणि उरलेले कुत्र्याला देण्यास सांगितले असल्याचे म्हणाली. मात्र, अल्बिन यांनी कुत्रा जर मेला तर शेजाऱ्यांना संशय येईल म्हणून कुत्र्याला आईस्क्रीम न दिल्याचे सांगितले आणि प्लेट स्वच्छ केल्याची कबुली अल्बिन यांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी याप्रकरणाचा छढा लावला. त्यानंतर बेनीने गुन्ह्याची कबुली दिली.


हेही वचा – देशात मुलींच्या विवाहाची वयोमर्यादा बदलणार; पंतप्रधानांनी दिले संकेत