घरताज्या घडामोडीउद्या वर्षातलं दुसरे चंद्रग्रहण, जाणून घ्या कधी आणि कसं दिसणार?

उद्या वर्षातलं दुसरे चंद्रग्रहण, जाणून घ्या कधी आणि कसं दिसणार?

Subscribe

हे चंद्रग्रहण छायाकल्प चंद्रग्रहण असून यादरम्यान कोणतेही सुतक पाळण्याची गरज नाही.

या वर्षातले दुसरे चंद्रग्रहण येत्या ५ जूनला लागणार आहे. हे चंद्रग्रहण छायाकल्प किंवा मांद्य प्रकाराचे असेल. या चंद्रग्रहणाच्या काळात काही खबरदारी घ्यावी लागेल. ५ जूनला छायाकल्प चंद्रग्रहणाला रात्री ११ वाजून १६ मिनिटांनी सुरुवात होईल आणि दुपारी ६ जूनला सकाळी २ वाजून ३२ मिनिटांनी संपेल. हे चंद्रग्रहण ज्येष्ठ पौर्णिमेला लागणार आहे. त्यामुळे हे चंद्रग्रहण केव्हा, कोठे दिसेल आणि त्याचा भारतावर किती परिणाम होईल ते जाणून घ्या.

चंद्रग्रहण कोठे दिसेल? 

हे चंद्रग्रहण आशिया, ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिकेत दिसेल. भारतात हे चंद्रग्रहण वेळेवर दिसेल, परंतु ग्रहणाचा कोणत्याही धार्मिक कार्यावर परिणाम होणार नाही. हे चंद्रग्रहण तब्बल तीन तास असेल. ग्रहणाच्या काळात चंद्र अर्धा नाही तर पूर्ण आकारात दिसेल. तसेच हे चंद्रग्रहण वृश्चिक राशीवर पडणार आहे.

- Advertisement -

या राशीतील लोकांनी काळजी घेणे आवश्यक

यावेळेच चंद्रग्रहण छायाकल्प चंद्रग्रहण असले. शास्त्रात हे चंद्रग्रहण मानले जात नाही. त्यामुळे या दिवशी कोणतेही काम करण्यास कोणतेही बंधन असणार नाही. हे ग्रहण वृश्चिक राशीतील पहिल्या नक्षत्रात असणार आहे. त्यामुळे वृश्चिक राशीचा लोकांना चंद्रग्रहणाच्या वेळी काळजी घेणे आवश्यक आहे.

- Advertisement -

छायाकल्प चंद्रग्रहण म्हणजे काय?

जेव्हा पृथ्वीच्या विरळ छायेतून चंद्र प्रवास करतो तेव्हा त्या ग्रहणाला छायाकल्प चंद्रग्रहण म्हणतात. या चंद्रग्रहणाला मांद्य चंद्रग्रहण देखील म्हटले जाते.

या चंद्रग्रहणावेळी सुतक असेल का?

हे एक उपछाया चंद्रग्रहण असल्यामुळे याचे सुतक पाळण्याची गरज नाही. त्यामुळे यावेळेस नेहमीप्रमाणे सर्व व्यवहार, पूजा, अर्चा करू शकता.

चंद्रग्रहण म्हणजे काय?

जेव्हा सूर्य आणि चंद्रच्या मध्ये पृथ्वी येते तेव्हा सूर्याचा संपूर्ण प्रकाश चंद्रावर पडत नाही आणि पृथ्वीची सावली चंद्रावर पडते. यालाच चंद्रग्रहण म्हणतात. चंद्रग्रहण नेहमी पौर्णिमेच्या रात्री होते. वर्षातून चंद्र पृथ्वीच्या सावलीतून जास्तीत जास्त तीन वेळा जातो तेव्हा चंद्रग्रहण लागते.

चंद्रग्रहण कसे पाहाल?

दुर्बिणीच्या सहाय्याने हे चंद्रग्रहण दिसेल. आपण व्हर्च्युअल टेलीस्कोपच्या सहाय्याने www.virtualtelescope.eu वर हे पाहू शकता. या व्यतिरिक्त युट्यूबवर CosmoSapiens, Slooh या चॅनेलवर लाईव्ह पाहू शकता. सूर्यग्रहणाप्रमाणे चंद्रग्रहण हे डोळ्यांना हानीकारक नसते. हे चंद्रग्रहण पौर्णिमेला असूनही ग्रहणात चंद्रबिंब कमी तेजस्वी होणार असल्यामुळे ते उघड्या डोळ्यांनी पाहू शकता.


हेही वाचा – केरळमधील हत्तीणीच्या मृत्यूसारखीच आणखी एक कोचीतील घटना उघडकीस


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -