घरदेश-विदेशमध्यप्रदेशमध्ये पिकनिकसाठी धबधब्यावर गेलेले ११ जण गेले वाहून

मध्यप्रदेशमध्ये पिकनिकसाठी धबधब्यावर गेलेले ११ जण गेले वाहून

Subscribe

मध्यप्रदेशच्या सुलतानगड धबधब्यावर पिकनिकसाठी गेलेले ११ जण वाहून गेले तर ३० ते ४० जण अडकले आहेत. १५ ऑगस्टची सुट्टी असल्याने हे सर्व जण पिकनिकसाठी आले होते. अचानक पाणी पातळीत वाढ झाल्याने हे सर्व जण अडकले आहेत. सध्या त्यांचे बचावकार्य युध्दपातळीवर सुरु आहे.

मध्यप्रदेशमध्ये पिकनिकसाठी धबधब्यावर गेलेले ११ तरुण अचानक पाणी पातळीमध्ये वाढ झाल्याने वाहून गेले आहेत तर ३० ते ४० जण धबधब्यामध्ये अडकले आहेत. अडकलेल्या ७ जणांना वाचवण्यात यश आले आहे. ग्वालियर जिल्ह्यातील मोहना येथे असणाऱ्या सुलतानगड धबधब्यावर हे सर्व जण पिकनिकसाठी गेले होते. अचानक पाणी वाढल्याने १०० फूट उंचावरुन खाली पडून ११ तरुण वाहून गेले. बुधवारी सायंकाळी ४ वाजता ही घटना घडली आहे.

- Advertisement -

३० ते ४० जण अडकले

१५ ऑगस्टला सुट्टी असल्याने शिवपुरीजवळ असलेल्या सुलतानगड धबधब्यावर मोठ्या संख्येने नागरिक पिकनिकसाठी आले होते. याच दरम्यान ४ वाजता अचानक धबधब्यामद्ये पाण्याचा प्रवाह वाढला. त्यावेळी धबधब्यावर २० जण मजा करत होते. पाणी वाढल्याने त्यामधील काही लोक घाबरुन धबधब्याच्या बाहेर आले. मात्र या पाण्यासोबत ११ जण वाहून गेले आहेत. तर ३० ते ४० जण धबधब्यात अडकले आहे. त्यापैकी ८ जणांना वाचवण्यात यश आले आहे. सध्या बचावकार्य युध्दपातळीवर सुरु आहे.

बचावकार्य युध्दपातळीवर सुरु

धबधब्यामध्ये अडकलेल्या लोकांना अजूनही बाहेर काढण्यात आले नाही. पाण्याच्या प्रवाहात वाढ होत असल्याने बचावकार्यात अडथळा येत आहे. घटनास्थळावर एनडीआरएफच्या टीमकडून बचावकार्य युध्दपातळीवर सुरु आहे. हेलिकॉप्टरच्या सहाय्याने त्यांना बाहेर काढण्याचे काम सध्या सुरु आहे. एका उंच खडकावर हे सर्व जण अडकले आहेत. सुलतानगड धबधब्यावर दोन मोठे खडक आहेत. त्यामधील एका ठिकाणी जवळपास ३० ते ४० जण अडकले आहेत. तर दुसऱ्या खडकावर एक तरुण अडकला आहे.

- Advertisement -

८ जणांना वाचवण्यात यश

पाण्याच्या प्रवाहात वाढ होत चालली आहे. धरणातून पाणी सोडल्यामुळे सुलतानगड धबधब्यातील पाणी पातळीत वाढ झाली असल्याचे वृत्त एएनआयने सांगितले आहे. सध्या पोलिसांनी देखील घटनास्थळी धाव घेतली आहे. पोलीस, स्थानिक आणि एनडीआरएफच्या टीमकडून बचावकार्य सुरु आहे. सध्या ७ जणांना वाचवण्यात यश आले असल्याचे शिवपुरीच्या डीएमनी सांगितले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -