घरताज्या घडामोडीमध्य प्रदेशातील कमलनाथ सरकार कोसळणार, मुख्यमंत्री राजीनामा देणार!

मध्य प्रदेशातील कमलनाथ सरकार कोसळणार, मुख्यमंत्री राजीनामा देणार!

Subscribe

मध्य प्रदेशातील कमलनाथ सरकार कोसळणार हे निश्चित झालं आहे. कारण लवकरच मध्य प्रदेशातील मुख्यमंत्री कमलनाथ लवकरच राजीनामा देणार आहेत. आज राज्यपालांकडे आपला राजीनामा सोपवणार आहेत. कमलनाथ यांना विधानसभेत शुक्रवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत आपले बहुमत सिद्ध करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला होता.

- Advertisement -

कमलनाथ यांनी शुक्रवारी एक पत्रकार परिषद बोलावली होती. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी त्यांचे सरकार स्थापन झाल्याच्या पहिल्या दिवसापासून भाजप षडयंत्र रचत असल्याचा आरोप केला. आपलं आजपर्यंतचे राजकारण हे निष्कलंक राहिले आहे आणि भाजपाप्रमाणे आपण सरकार वाचवण्यासाठी तडजोड करणार नाही असं सांगत त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार असल्याचे जाहीर केले.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -