घरताज्या घडामोडीLive Update: नागपुरात २४ तासांत ६,१९४ रुग्णांची नोंद, ७५ जणांचा मृत्यू

Live Update: नागपुरात २४ तासांत ६,१९४ रुग्णांची नोंद, ७५ जणांचा मृत्यू

Subscribe

नागपुरात गेल्या २४ तासांत ६ हजार १९४ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ७५ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर आज दिवसभरात ५ हजार ८९४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आता नागपुरातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ३ लाख ९ हजार ४३वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ६ हजार १०९ जणांचा मृत्यू झाला असून २ लाख ३८ हजार ५९९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच सध्या ६४ हजार ३३५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

- Advertisement -

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांना कोरोनाची लागण झाली आहे. याबाबतची माहिती त्यांनी ट्वीटरद्वारे दिली आहे.

- Advertisement -

ks


गोव्यात आज दिवसभरात ९२७ नवे कोरोनाबाधित आढळले असून ६ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तसेच २८२ जण कोरोनामुक्त झाले आहे. गोव्यातील कोरोनाबाधितांची संख्या ६५ हजार ४९९वर पोहोचली आहे.


जनता दल पक्षाचे अध्यक्ष आणि अभिनेते पवन कल्याण यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. सध्या ते सुरक्षित असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.


आरएसएसचे प्रमुखे मोहन भागवत यांनी आज डॉक्टरांनी डिस्चार्ज देण्याचा निर्णय घेतला आहे. पण त्यांना पाच दिवस होम क्वारंटाईन राहण्याचा सल्ला दिला आहे.

 


नवी मुंबईतील खाडीमध्ये मोठ्या संख्येने स्थलांतरित फ्लेमिंगो पक्षी दिसले.


सीबीआयचे माजी संचालक रणजित सिन्हा यांचं शुक्रवारी सकाळी निधन झालं. रणजित सिन्हा हे १९७४ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी होते. त्यांनी अनेक वरिष्ठ पदे भूषवली. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात सीबीआयचे संचालक आणि इंडो-तिबेट सीमा पोलीस (ITBP) चे डायरेक्टर जनरल (डीजी) याच्यासह अनेक वरिष्ठ पदांवर काम केलं. शुक्रवारी पहाटे साडेचार वाजता त्यांचा मृत्यू झाला.


मुंबईतील हाफकिन इन्स्टिट्यूटला कोवॅक्सिन लसीची निर्मिती करण्यास परवानगी दिल्याबद्दल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले.


आतापर्यंत १० लाखांहून अधिक मुंबईकर कोरोनापासून सुरक्षित


देशात गेल्या २४ तासात २ लाख १७ हजारांहून अधिक रुग्णांची नोंद तर १ हजारांहून अधिकांचा कोरोनाने बळी


कॉंग्रेस नेते रणदीपसिंग सुरजेवाला यांना कोरोनाची लागण


सातारा जिल्ह्यात बावधनच्या बगाड यात्रेमुळे आतापर्यंत १३४ जण पॉझिटिव्ह

सातारा जिल्ह्यात बावधनच्या बगाड यात्रेमुळे आतापर्यंत १३४ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. २ एप्रिल रोजी पार पडलेल्या यात्रेनंतर कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसतेय. दिवसेंदिवस वाढणाऱ्या बाधितांच्या संख्येमुळे बावधन गावात कोरोना वाढण्याची भिती कायम असल्याचे दिसतेय.


पंढरपूर-मंगळवेढा तालुक्यातील माजी जिल्हा परिषद सदस्य आणि बोराळेचे सरपंच बाबासाहेब भीमराव पाटील यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. ते ७० वर्षांचे होते. मिळालेल्या माहितीनुसार, नुकत्याच झालेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जाहीर सभेत त्यांनी हजेरी लावली होती. पाटील यांच्या निधनामुळे मंगळवेढा तालुक्यात दुःख व्यक्त केले जात आहे. काही दिवसांपूर्वी पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत विविध प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती. या प्रचारसभेला माजी जिल्हा परिषद सदस्य आणि बोराळेचे सरपंच बाबासाहेब भीमराव पाटील हे देखील उपस्थित होते.


बुधवारी राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत किंचित घट झाल्याचे पाहायला मिळाले होते. पण आज पुन्हा एकदा नवीन कोरोनाबाधितांची संख्या ६० हजार पार गेली आहे. गेल्या २४ तासांत ६१ हजार ६९५ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ३४९ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ३६ लाख ३९ हजार ८५५वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ५९ हजार १५३ जणांचा मृत्यू झाला आहे.


मुंबईत गेल्या २४ तासांत ८ हजार २१७ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ४९ जणांचा मृत्यूची नोंद झाली आहे. तर १० हजार ९७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आतापर्यंतची मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या ५ लाख ५३ हजार १५९वर पोहोचली आहे. सध्या ८५ हजार ४९४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -