घरदेश-विदेशदहशतवादी हल्ल्याचा कट उधळला

दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला

Subscribe

साडेसहा किलो स्फोटके जम्मू बस स्थानकातून जप्त

पुलवामा दहशतवादी हल्ल्याला दोन वर्षे पूर्ण झाले असताना जम्मू-काश्मीरमध्ये मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा कट जम्मू-काश्मीर पोलिसांनी उधळून लावला आहे. पोलिसांनी जम्मू बस स्थानकावरुन तब्बल साडेसहा किलो इम्प्रोव्हाईज्ड एक्सप्लोझिव्ह डिव्हाईस अर्थात ज्वलंंत स्फोटके (ईड)जप्त केली आहेत. त्यामुळे मोठा घातपात टळला. अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार दहशतवादी हल्ला करण्याचा संशय होता. त्या पार्श्वभूमीवर पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांकडून मोठी खबरदारी घेण्यात आली होती.

गेल्या 3-4 दिवसांपासून आम्ही अलर्ट होतो. दहशतवादी पुलवामा हल्ल्याला दोन वर्षे पूर्ण होत असल्याने मोठ्या हल्ल्याच्या तयारीत होते आणि हा हल्ला जम्मू शहरात होणार होता. शनिवारी रात्री पोलिसांनी सोहेल नावाच्या व्यक्तीला ताब्यात घेतले होते. तो संशयितरित्या फिरत होता. सोहेल हा अल बद्र तंजिम या दहशतवादी संघटनेसाठी काम करत होता. त्याच्याकडे चौकशी करत असताना साडेसहा किलो ज्वलंत स्फोटके सापडली, अशी माहिती जम्मूचे आयजी मुकेश सिंह यांनी दिली.

- Advertisement -

संशयिताकडे चौकशी केली असता तो नर्सिंग कॉलेजचा विद्यार्थी असल्याचे त्याने सांगितले. तो चंदीगडमध्ये शिकत होता. त्याला पाकिस्तानमधून एक मेसेज आला होता की, या ठिकाणी ज्वलंंत स्फोटके ठेवायची आहेत. या मेसेजद्वारे स्फोटके ठेवण्यासाठी सोहेलला 3-4 जागा सांगितल्या गेल्या होत्या. त्यात रघुनाथ मंदिर, बस स्थानक, रेल्वे स्टेशन आणि लखदाता बाजार या जागांचा समावेश होता. त्यानंतर त्याला श्रीनगरसाठी प्लाईट घ्यायची होती. तिथे अथर शकील नावाच्या व्यक्तीला भेटायचे होते. या हल्ल्याची माहिती चंदीगडमधील अजून एका मुलाला होती. त्याचे नाव काझी वसिम आहे. त्यालाही चंदीगडमध्ये ताब्यात घेण्यात आले आहे. त्यासोबतच हाफिद नवी या व्यक्तीलाही पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे.

2 वर्षांपूर्वी 14 फेब्रुवारीला जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी आत्मघाती हल्ला केला होता. या हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले होते. रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीआरपीएफच्या त्या 40 जवानांना श्रद्धांजली अर्पण केली.

- Advertisement -

चेन्नईमध्ये एका कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान मोदी यांनी पुलवामा हल्ल्याचा दिवस कुणीही विसरु शकणार नाही, अशी भावना व्यक्त केली. आम्हाला आमच्या सुरक्षा रक्षकांवर गर्व आहे. त्यांची बहादुरी येणार्‍या पिढ्यांना प्रेरणा देत राहील. देशाच्या सशस्त्र दलांना वारंवार हे सिद्ध करून दाखवले आहे की, ते देशाच्या रक्षणासाठी पूर्णपणे सक्षम आहेत, असेही पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -