घरट्रेंडिंगलग्नाची तारीख ठरली आणि त्याला कोरोना झाला, पण म्हटला एकदा ठरलं की...

लग्नाची तारीख ठरली आणि त्याला कोरोना झाला, पण म्हटला एकदा ठरलं की ठरलं!

Subscribe

आपल्याकडे साधारणपणे मार्च ते जून हा काळ लग्नसराई अर्थात लग्नाचा सीजन मानला जातो. या काळात अनेक मुहूर्त असतात आणि जवळपास दररोज कुठे ना कुठए लग्न होत असतात. पण नेमका याच काळात कोरोना टपकला आणि सगळ्यांचं नियोजन पार उधळलं गेलं. अनेकांची लग्न पुढे ढकलली गेली. अनेकांनी अगदी बोटांवर मोजण्याइतक्या नातेवाईकांच्या साक्षीनं सप्तपदी घेतली. काहींनी तर थेट ऑनलाईच लग्नाचा थाट मांडला. पण सध्या सोशल मीडियावर एक लग्न भलतंच ट्रेंडिंगमध्ये आहे. कारण या लग्नातला नवरदेव आपल्या सलमान खानसारखा ‘एक बार जो कमिटमेंट कर दी, तो मै खुद की भी नहीं सुनता’ असं मानणाऱ्यातला आहे. एकदा ठरलं म्हणजे ठरलं!

हे लग्न झालं अमेरिकेच्या टेक्सासमध्ये…

कार्लोस मुनिझ नावाचा एक ४१ वर्षांचा नवरदेव आपल्या लग्नाच्या तयारीत होता. त्याची गर्लफ्रेंड अर्थात प्रेयसी ग्रेससोबत तो लग्नगाठ बांधणार होता. सगळं काही व्यवस्थित सुरू होतं. बाहेर कोरोना पसरलेला असतानाही मोजक्या लोकांच्या उपस्थितीत लग्नाची सर्व तयारी झाली होती. पण ऐन लग्नाच्या काही दिवस आही कार्लोसला कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं. त्याला लक्षणं दिसत असल्यामुळे तातडीनं रुग्णालयात भरती करावं लागलं. तिकडे त्याची ट्रीटमेंट सुरू झाली आणि इकडे लग्नाची तारीख जवळ येऊ लागली!

- Advertisement -

पण पठ्ठ्यानं सलमान खानचा डॉयलॉग…

पार तोंडपाठ केला होता की काय कुणास ठाऊक! त्यानं ग्रेसला राजी केलं आणि थेट हॉस्पिटलमध्येच लग्नाचा घाट घातला. यात त्याला तो दाखल असलेल्या सॅन अँटोनियो हॉस्पिटलमधल्या स्टाफने देखील पुरेपूर साथ दिली. ठरल्या दिवशी ग्रेस लग्नासाठीचा व्हाईट गाऊन परिधान करून रुग्णालयात आली. कार्लोस तयारच होता. ख्रिस्ती पद्धतीने त्यांचं लग्न लावण्यासाठी फादर देखील हजर झाले. आजूबाजूला रुग्णालयाचा स्टाफ आणि त्यांची चारदोन मित्रमंडळी इतकेच काय ते वऱ्हाडी हजर होते. आणि ठरल्या वेळी या दोघांचं हे अजब-गजब लग्न पार पडलं. तेही कोरोनाचे सर्व नियम पाळूनच बरं का!

लग्नानंतर काही दिवसांतच कार्लोस कोरोनामुक्त झाला. त्याचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आणि तो रिकव्हर देखील होऊ लागला. पण हे अजब लग्न या दोघांसोबतच त्यावेळी उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्याच आयुष्यभर लक्षात राहील हे नक्की!

- Advertisement -

हा पाहा लग्नाचा व्हिडिओ!

Methodist Hospital COVID-19 Patient Wedding

COVID-19 can't stop love. Carlos Muniz and his fiancé, Grace had everything arranged to wed and were ready to say ‘I Do’ when he suddenly came down with COVID-19. His condition became critical, and he was placed on ECMO, a form of life support, as a last chance at survival. Carlos’s fight for life had diminished over the weeks and his emotions drained from his body..Watch how the power of love and the wedding of a lifetime helped Carlos find the motivation to overcome the virus. This special moment not only brought joy and strength to the patient and family, but it also presented a major victory to the COVID-19 staff at Methodist Hospital.

Posted by Methodist Healthcare System on Tuesday, August 18, 2020

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -