घरदेश-विदेशविमानातून सापाची तस्करी करणाऱ्याला अटक

विमानातून सापाची तस्करी करणाऱ्याला अटक

Subscribe

विमानातून प्रवास करताना एका प्रवाशाने सापाची तस्करी करण्याचा प्रयत्न केला आहे. पँटमधून सापाची तस्करी करण्याचा प्रयत्न हा प्रवासी करत होता.

आज पर्यंत सापांना विमानातून तस्करी करण्याचा प्रकार अनेकदा इंग्रजी चित्रपटांमध्ये बघायला मिळतो. विमानातून विविध वस्तू तस्करी करण्याच्या घटना उघडकीस येत असतात. या घटनांमध्ये अनेकदा सोने, अम्ली पदार्थ आणि दुर्मिळ प्रण्यांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. विमानातून दुर्मिळ जातीच्या सापाची तस्करी करण्याचा प्रयत्न करत असलेल्या एका प्रवाशाला नुकतेच विमानतळ अधिकाऱ्यांनी अटक केले आहे.  बोआ कंस्ट्रिक्टर जातीच्या सापाची तस्करी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. एका ४३ वर्षीय प्रवाशाला या प्रकरणी पकडण्यात आले आहे. जर्मनीची राजधानी बर्लिन येथील शोनफेल्ड विमानतळावर ही घटना घडली. 

कसा घडला प्रकार

अटक प्रवाशाने इस्रायल विमानतळावरून जर्मनी येथे जाण्यासाठी विमान पकडले होते. प्रवासादरम्यान त्याने आपल्या पँटमध्ये हा दुर्मिळ साप लपवला होता. सुरक्षा अधिकाऱ्यांना चखमा देत त्याने या सापाला विमानात नेले. विमानात कोणालाही संक्षय येऊ नये म्हणून त्याने पूर्ण काळजी घेतली. जर्मनीत लँड झाल्यानंतर विमानतळावर तपासणी दरम्यान अधिकाऱ्यांना संक्षय आला. त्यांनी या प्रवाशाला बाजूला घेऊन तपास केला असता त्याच्या पँटमध्ये साप आढळला. या प्रवाशाला ताब्यात घेण्यात आले. सध्या प्रवाशाची चौकशी सुरु असून यापूर्वी त्याने कितीवेळा तस्करी केली? या बाबत चौकशी सुरु केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -