घरAssembly Battle 2022Election Result 2022 : शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र, पण मतं मात्र नोटापेक्षा कमी, देवेंद्र...

Election Result 2022 : शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र, पण मतं मात्र नोटापेक्षा कमी, देवेंद्र फडणवीसांचा टोला

Subscribe

गोव्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र लढत होती. पंरतु दोघांची मत एकत्र केली तर नोटापेक्षासुद्धा कमी मत मिळाली आहेत. असा टोला गोव्याचे निवडणूक प्रभारी आणि महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. शिवसनेची लढाई आमच्यासोबत नाही तर त्यांची लढाई नोटाशी असल्याचा टोला फडणवीसांनी लगावला आहे. गोव्यात सत्ता स्थापन करण्याबाबत केंद्रीय संसदीय मंडळ निर्णय घेईल असे फडणवीस म्हणाले आहेत.

मागील वेळापेक्षा अधिक मतांनी भाजपचा विजय झाला आहे. याचा अर्थ असा होतो की, आम्ही मतांच्या विभागणीवरुन आलो नाही. सकारात्मक मतांमुळे भाजप निवडून आले आणि याचा आनंद आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंतसुद्धा विजयी झाले आहेत. तसेच मला विश्वास आहे की, गोव्यात आम्ही चांगले सरकार स्थापन करु असे देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

शिवसेनेची लढाई नोटाशी

शिवसेनेची लढाई आमच्यासोबत नाही तर त्यांची लढाई ही नोटाशी आहे. यापूर्वीच मी सांगितले आहे. गोव्यात राष्ट्रवादी आणि शिवसेनेची युती होती. परंतु त्यांना नोटापेक्षाही कमी मत मिळाली आहेत. दोघांची मत एकत्र केली तरी ती नोटाहून कमी आहे. आमच्या मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात त्यांनी सभा घेतली त्या ठिकाणी त्यांना ९९ मत मिळाली आहे. १०० मतेसुद्धा मिळू शकली नाही असा टोला फडणवीसांनी शिवसेनेवर लगावला आहे.

संजय राऊतांना काय शिक्षा द्यायची विचारा

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपची सत्ता गोव्यात पुन्हा येणार नाही असे मी लेखी देतो, अशी आठवण फडणवीसांना करुन दिली. यावर फडणवीस म्हणाले की, आता संजय राऊत यांना कोणती शिक्षा द्यायची हे त्यांना विचारा, तसेच काँग्रेसला आत्मचिंतन करण्याची गरज आहे. जे पक्ष परिवारवादी आहेत त्यांना या निवडणुकीमध्ये मोठा धडा शिकवला असा टोला फडणवीसांनी काँग्रेस आणि समाजवादी पार्टीला लगावला आहे.

- Advertisement -

केंद्रीय संसदीय मंडळ सरकारबाबत निर्णय घेतील

गोव्यात मुख्यमंत्री प्रमोद सावतं यांच्या नेतृत्वात निवडणूक लढलो परंतु आता सत्ता स्थापन करण्याबाबत केंद्रीय संसदीय मंडळ निर्णय घेईल. पुढचा निर्णय आम्ही करत नाही असे फडणीसांनी सांगितले आहे.


हेही वाचा : UP Election Result Analysis: यूपीमध्ये पुन्हा एकदा भाजपचं कमळ फुललं, ‘या’ सहा फॅक्टरचा मोठा फायदा

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -