घरक्राइमसप्तपदी न होता झाले लग्न! पाटणा हायकोर्टाच्या निर्णयाला SC ची स्थगिती

सप्तपदी न होता झाले लग्न! पाटणा हायकोर्टाच्या निर्णयाला SC ची स्थगिती

Subscribe

नवी दिल्ली : बंदुकीच्या धाकावर आणि सप्तपदी न होता झालेल्या विवाहप्रकरणी पाटणा उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने नुकतीच स्थगिती दिली. पाटणा उच्च न्यायालयाने भारतीय लष्करातील जवानाचा विवाह रद्द केला होता. या तरुणाचे कथितरीत्या अपहरण करण्यात आले होते. यानंतर बंदुकीच्या धाकावर त्याचे लग्न लावले, असा दावा करण्यात येतो. या प्रकारच्या विवाहाला बिहारमध्ये ‘पकडौआ शादी’ म्हणून ओळखले जाते, म्हणजे सक्तीने लग्न करणे.

हेही वाचा – शिवडी- न्हावाशेवा अटल सेतू महाराष्ट्राचा ‘गेम चेंजर’ प्रकल्प – CM Eknath Shinde

- Advertisement -

सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने या प्रकरणी संबंधितांना नोटीस बजावतानाच, लष्कर जवानाच्या पत्नीने दाखल केलेल्या अपिलावर पाटणा उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. यापूर्वी, गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये या प्रकरणावर सुनावणी करताना पाटणा उच्च न्यायालयाने कौटुंबिक न्यायालयाने तीन वर्षांपूर्वी दिलेला निर्णय रद्द केला होता.

- Advertisement -

कोणताही धार्मिक किंवा अध्यात्मिक विधी न करता केवळ भांगेत कुंकू भरण्यास भाग पाडण्यात आल्याचे लष्करी जवानाचे म्हणणे आहे. तथापि, कौटुंबिक न्यायालयाने विवाह रद्द करून पतीला दिलासा देण्यास नकार दिला होता. त्यामुळे हे प्रकरण पाटणा उच्च न्यायालयात गेले. त्यावर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने सांगितले की, केवळ एखाद्याला पकडून भांगेत कुंकू भरायला लावणे म्हणजे लग्न नाही. जोपर्यंत वधू-वर सप्तपदी किंवा सात फेरे घेत नाहीत तोपर्यंत हिंदू विवाह पूर्ण होत नाही, अशी टिप्पणी करत उच्च न्यायालयाने हा विवाह रद्द केला होता.

हेही वाचा – Raj Thackeray यांनी किती सहकारी संस्था उभ्या केल्या? Ajit Pawar यांचा सवाल

नेमके काय घडले?
ही घटना 2013मध्ये घडली असून त्यावेळी संबंधित तरुण लखीसराय येथील मंदिरात पूजा करण्यासाठी जात होते. यादरम्यान त्याचे अपहरण करण्यात आले. हा तरुण त्यावेळी सैन्यदलात हवालदार होता. अपहरण केल्यानंतर त्याला बंदुकीच्या जोरावर एका मुलीशी लग्न करण्यास भाग पाडले. दुसरीकडे, आपला विवाह सर्व हिंदू रितीरिवाजानुसार जून 2013मध्ये झाल्याचा दावा त्या तरुणीने केला आहे. एवढेच नव्हे तर, लग्नाच्या वेळी माझ्या वडिलांनी आम्हाला सोने, 10 लाख रुपये रोख आणि इतर वस्तू भेट म्हणून दिल्या होत्या, असेही तिने सांगितले. मात्र त्यानंतर बळजबरीने केलेला आपला विवाह रद्द करण्याची विनंती त्याने कौटुंबिक न्यायालयाला केली. पण 27 जानेवारी 2020 रोजी कौटुंबिक न्यायालयाने त्याची मागणी फेटाळली. यानंतर त्याने पाटणा उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

हेही वाचा – इतिहासाचा विपर्यास करणं टाळलं पाहिजे, असे म्हणत Sharad Pawar यांची ‘या’ नाटकावर अप्रत्यक्ष टीका

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -