घरताज्या घडामोडी...आणि उत्तम आयुष्य जगा, मोबाइलचा शोध लावणाऱ्यानेच जगाला दिला सल्ला

…आणि उत्तम आयुष्य जगा, मोबाइलचा शोध लावणाऱ्यानेच जगाला दिला सल्ला

Subscribe

२१ व्या शतकात मोबाइलचा वापर प्रचंड प्रमाणात केला जातो. सध्याच्या कलयुगात मोबाइलचं युग सुरू आहे. आजच्या युगात मोबाइल फोनपासून दूर राहण्याची कल्पनाही कुणी करू शकत नाही. सततच्या वापरात आणि व्यवहारात मोबाइलचा अधिक प्रमाणात वापर केला जातो. त्यामुळे मोबाइलचं व्यसन खूप वाढलं आहे. दरम्यान, मोबाइलचं हे वाढतं व्यसन पाहून या उपकरणाचा शोध लावणारे इंजिनीअर मार्टिन कूपर स्वत: काळजीत पडले आहेत. मोबाइलचा वापर कमी करा आणि उत्तम आयुष्य जगा, असा सल्ला मोबाइलचा शोध लावणारे इंजिनीअर मार्टिन कूपर यांनी जगाला दिला.

मोबाइलचे जनक अशी ओळख असलेल्या मार्टिन कूपर यांना नुकतंच माहिती विज्ञान आणि संवाद क्षेत्रातील ‘मार्कोनी’ या सर्वोच्च पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. त्या प्रसंगी बोलताना ते म्हणाले की, रस्ता ओलांडतानाही लोक मोबाइलच्या स्क्रीनमध्ये गडलेले पाहून मी हादरून जातो. त्यांना भानच राहत नाही. कदाचित काही लोक कारखाली आल्यानंतरच त्यांना याचं गांभीर्य कळेल, असं कूपर म्हणाले.

- Advertisement -

आपल्या खिशामध्ये असलेल्या या छोट्या उपकरणाची क्षमता अफाट आहे. एक दिवस हा मोबाइल अनेक रोगांवर मात करण्यास मदत करेल. परंतु एकच समस्या आहे की, लोक मोबाइलकडे जास्त आकर्षिले जातात. तसेच अधिक लोकं जास्त प्रमाणात मोबाइलवर वेळ घालवत असतात, याबद्दलही त्यांनी आश्चर्य व्यक्त केलं.

‘बीसीसी ब्रेकफास्ट’ या कार्यक्रमात कूपर यांची मुलाखत घेणाऱ्या महिलेनं त्यांना एक प्रश्न विचारला. मी दिवसभरातील पाच तास मोबाइलवर घालवते. त्यामुळे माझ्यासारख्या लोकांना तुम्ही काय सल्ला द्याल, असा सवाल तिने कूपर यांना विचारला. तेव्हा कूपर चकित झाले आणि म्हणाले की, तुम्ही खरोखरच मोबाइलवर पाच तास घालवता?, चांगलं आयुष्य जगा. आभासी जगातून बाहेर या आणि खरंखुरं आयुष्य जगा, असं सल्ला कूपर यांनी दिला.

- Advertisement -

दरम्यान, मार्टिन कूपर हे स्वत: अ‍ॅपलचं घड्याळ आणि टॉप-एंड आयफोन वापरतात. ई-मेल, फोटो, YouTube आणि ऐकण्याच्या गोष्टींमध्ये ते योग्य समतोल साधतात.


हेही वाचा : शाहीनबाग चालतं? हिंदू रस्त्यावर उतरले की त्रास होतो; हा कोणता न्याय? सर्वोच्च न्यायालयाच्या मतावर मनसेचे सवाल


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -