घरताज्या घडामोडीCoronavirus: परदेशातून आलेल्या मेरी कोमने केला राष्ट्रपतींसोबत ब्रेकफास्ट

Coronavirus: परदेशातून आलेल्या मेरी कोमने केला राष्ट्रपतींसोबत ब्रेकफास्ट

Subscribe

मेरी कॉमने प्रोटोकॉल तोडल्याचे मान्य केलं आहे.

करोना विषाणूचा प्रादुर्भाव देशात वेगाने सुरु आहे. विषाणूचा संसर्ग थांबवण्यासाठी परदेशातून येणाऱ्यांना तसेच विषाणूची लक्षणे असणाऱ्यांना १४ दिवस क्वारंटाईन करण्यास सांगितले आहे. असे असताना भारताची बॉक्सर आणि राज्यसभेची खासदार मेरी कोम हिने हे आदेश मोडले आहेत. मेरी कोम हिने क्वारंटाईन प्रोटोकॉल मोडत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या चहापानाच्या कार्यक्रमाला उपस्थित होती.

- Advertisement -

मेरी कोमने जॉर्डन येथे झालेल्या आशिया-ओशिनिया ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत भाग घेतला होता. त्यानंतर ती १३ मार्च रोजी मायदेशी परतली होती. भारतात आल्यानंतर करोनामुळे १४ दिवस घरी राहणार असल्याचे मेरी कोमने ट्वीटरच्या माध्यमातून सांगितले होते. मात्र, १८ मार्च रोजी राष्ट्रापती रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रपती भवनात आयोजित केलेल्या चहापानाच्या कार्यक्रमाला उपस्थित होती. याबाबतचे फोटो राष्ट्रपतींच्या अधिकृत ट्वीटर हँडलवरुन फोटो शेअर केले आहेत. मेरी कॉमने प्रोटोकॉल तोडल्याचे मान्य केले आहे.


हेही वाचा – Coronavirus: पुण्यात सापडलेल्या करोनाबाधिताच्या संपर्कात आले १०० जण!

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -