घरदेश-विदेशPost Office : पोस्ट खात्यात मेगाभरती, दहावी पास उमेदवारांना संधी

Post Office : पोस्ट खात्यात मेगाभरती, दहावी पास उमेदवारांना संधी

Subscribe

भारतीय पोस्ट खात्यामध्ये मेगाभरती काढण्यात आली आहे. ओडिसा पोस्टल सर्कलमध्ये ग्रामीण पोस्टमन या पदासाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. या पदासाठी एकूण २०६० जागा रिक्त आहेत.
दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी ही मोठी संधी असून त्यासाठी ऑनलाइन प्रक्रिया देखील सुरू झाली आहे.

या पदासाठी १०,००० पगार दिला जाईल. संबंधित उमेदवाराला गणित, हिंदी, इंग्रजी भाषेचे ज्ञान असावे. या पदासाठी वय १८ ते ४० वर्षांपर्यंत निर्धारित करण्यात आले आहे.

- Advertisement -

कधी अर्ज कराल

  • १ सप्टेंबरपासून ऑनलाइन अर्ज नोंदणीला सुरुवात झाली आहे.
  • अर्ज भरण्याची अंतिम मुदत ३० सप्टेंबर असणार आहे.

आकारले जाणारे शुल्क खालीलप्रमाणे

सामान्य, ओबीसी, ईडब्ल्यूएस वर्गाच्या पुरुष उमेदवारांना १०० रु. शुल्क आकारले जाईल. तसेच आरक्षित म्हणजेच एससी, एसटी वर्गातील महिला उमेदवारांसाठी शुल्क आकारले जाणार नाही. तर हेड पोस्ट ऑफिस किंवा नेट बँकिंगद्वारे शुल्क भरता येणार आहे.

अर्ज कसा कराल?

ग्रामीण पोस्टमन या पदासाठी ऑनलाइन अर्ज करण्याकरिता www.appost.in या वेबसाईटवर जावे लागेल. अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रिंट काढून ती पुढील प्रक्रियेसाठी आपल्या सोबत ठेवावी. उमेदवारांच्या दहावीच्या गुणांच्या आधारे त्यांची हा पदासाठी निवड केली जाणार आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -