संतापजनक! नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर महिलेवर सामूहिक बलात्कार; चार आरोपींना अटक

midnight gang rape at new delhi railway station arrested 4 assault

देशाची राजधानी दिल्लीत पुन्हा एकदा महिलेवर सामुहिक बलात्कार झाल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. दिल्लीच्या रेल्वे स्टेशनवर ही घटना घजाली आहे. यावेळी एका महिलेवर दोघांनी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला तिच्यावर इतर साथीदारांच्या मदतीने सामुहिक बलात्कार केला, या प्रकरणी चार आरोपींना आत्तापर्यंक पोलिसांनी अटक कली आहे. यातील 2 मुख्य आरोपी असून ते सर्व रेल्वेचे कर्मचारी आहेत. गुरुवारी रात्री 12.30 ते 1,30 दरम्यान ही घटना घडली.

समोर आलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेचे वय साधारण 28 – 30 वर्षे आहे. आरोपींपैकी एकाला पीडित महिला पूर्वीपासूनच ओळख होती. दरम्यान गुरुवारी रात्री त्या आरोपीने पीडितेला काही तरी बहाणा करून रेल्वे स्टेशनवर बोलावले. त्यानंतर आरोपीने तिला नवी दिल्ली स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 8-9 वरील एका खोलीत घेऊन गेला. या खोलीचा वापवर फुटओव्हर ब्रिजखालील इलेक्ट्रिल डिपार्टमेंट आणि इतर कामासाठी होत होता. यानंतर मुख्य आरोपींनी त्या खोली त्याच्या इतर तीन साथीदारांना बोलावले, यावेळी सर्व आरोपी नशेत होते, यावेळी सर्वांनी पीडित महिलेला धमकावत तिच्यावर सामुहिक बलात्कार केला. यानंतर पीडितेला घटनास्थळवर त्याच अवस्थेत सोडून आरोपी पळू गेले. यानंतर पीडितेने मध्यरात्री 2.30 वाजता पीसीआर कॉल केला. यानंतर तातडीने जीआरपी आणि रेल्वे पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहचले आणि संपूर्ण घटने पीडितेकडून ऐकून घेत आरोपांची तपास सुरु केला, रेल्वे स्टेशनच्या या गँगरेपच्या घटनेमुळे दिल्ली शहर पुन्हा हादरले आहे.

या घटनेत 2 आरोपींचा थेट संबंध असून इतर दोघांना गुन्हेगारांनी मदत केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान सामुहिक बलात्कार करणारे आरोपी रेल्वे कर्मचारी असल्याचे जीआरपीला कळताच त्यांचा शोध सुरु केला, यानंतर नवी दिल्ली रेल्वे स्टेशन पोलिसांनी मुख्य़ आरोपीला जेरबंद केले. त्याच्या चौकशीनंतर 3 आरोपींनाही अटक करण्यात आली आहे. पोलीस तपासात हे सर्व आरोपी रेल्वेचे कर्मचारी होती अशी माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.


पश्चिम बंगालमध्ये ईडीची छापेमारी, ममतांच्या निकटवर्तीयाकडून तब्बल 20 कोटी जप्त