शौर्य पुरस्काराची घोषणा; सेना अधिकाऱ्यांचा सन्मान

जम्मू-काश्मिर येथील बडगामा येथे सैन्य दलाने ऑपरेशन केले होते. या ऑपरेशनमध्ये डोगरा रेजिमेंटचे मेजर शुभांग यांनी एका अतिरेक्याला ठार केले होते. तसेच आपल्या जखमी सहकार्याला तेथून सुरक्षित बाहेर काढले होते. या शौर्यासाठी मेजर शुभांग यांना शौर्य पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. 

new recruitment scheme for defence forces agneepath supreme court hearing today for defence forces

नवी दिल्लीः प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने शौर्य पुरस्काराची घोषणा केली. संरक्षण मंत्रालयाने एकूण ४१२ पुरस्कारांची घोषणी बुधवारी केली. सशस्त्र दल व अन्य सुरक्षा जवानांचे ४१२ पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. त्यामध्ये चार अधिकाऱ्यांना मरणोत्तर सह अन्य सहाजणांना कीर्ती चक्र पुरस्कार जाहीर झाला आहे. १५ शौर्य पुरस्कारांमध्ये दोन अधिकाऱ्यांना मरणोत्तर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

जम्मू-काश्मिर येथील बडगामा येथे सैन्य दलाने ऑपरेशन केले होते. या ऑपरेशनमध्ये डोगरा रेजिमेंटचे मेजर शुभांग यांनी एका अतिरेक्याला ठार केले होते. तसेच आपल्या जखमी सहकार्याला तेथून सुरक्षित बाहेर काढले होते. या शौर्यासाठी मेजर शुभांग यांना शौर्य पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.

गेल्या वर्षी एप्रिलमध्ये पुलवामा येथे सैन्य दलाची अतिरेक्यांसोबत चकमक झाली होती. या चकमकीत दोन अतिरेकी ठार झाले होते. दोन अतिरेक्यांना ठार करणाऱ्या राजपूत रेजिमेंटचे नाईक जितेंद्र सिंह यांना कीर्ती पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. चिनार कॉर्प्स कमांडर लेफ्टिनेंट जनरल अमरदीप सिंह औजाला यांना उत्तम युद्ध सेवा पुरस्कार (यूवाईएसएम) जाहीर झाला आहे. 3 कॉर्प्स कमांडर लेफ्टिनेंट जनरल आरके तिवारी व १४ कॉर्प्स प्रमुख लेफ्टिनेंट जनरल ए सेनगुप्ता यांनाही पुरस्काराने सन्मानित केले आहे.

 

कीर्ति चक्र

1. एसएस-46926एक्स मेजर शुभांग, डोगरा, 62 आरआर
2. 3011334एक्स एनके जितेंद्र सिंह, राजपूत, 44 आरआर

शौर्य चक्र

1. IC-77164W मेजर आदित्य भदौरिया,
2. एसएस-48517एच कॅप्टन अरुण कुमार,
3. एसएस-48529एक्स कॅप्टन युधवीर सिंह,
4. एसएस-48830एन कॅप्टन राकेश टी आर,
5. 13773112पी एन के जसबीर सिंह, (मरणोत्तर)
6. 13779485वाई एल/एनके विकास चौधरी, जेएके आरआईएफ, 3 आरआर
7. 665/एसपीओ कांस्टेबल मुदासिर अहमद शेख, जम्मू-कश्मीर पुलिस (बारामूला) (मरणोत्तर)